शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

बंद जिल्हा परिषद शाळांत साप, विंचवांचा धोका; झाडे झुडूपेही वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:42 IST

जिल्ह्यातील काही शाळा सुरू तर काही बंद आहेत. बंद शाळा जशाच्या तशा असून, त्या शाळांमध्ये आता उंदरांनी आपले घर ...

जिल्ह्यातील काही शाळा सुरू तर काही बंद आहेत. बंद शाळा जशाच्या तशा असून, त्या शाळांमध्ये आता उंदरांनी आपले घर केले आहे. त्या उंदरांना आपले भक्ष्य बनविण्यासाठी सापांनीही शाळेत जागा पकडली. साप आणि विंचवांचा वावर त्या शाळांमध्ये सुरू झाला. कंबरेएवढे गवत आणि कचरा शाळेच्या परिसरात जमा झाला. ज्या शाळेला आवारभिंत नाही किंवा आवारभिंत असूनही गेट नाही, अशा शाळेच्या आवारात त्या गावातील जनावरे येऊन चरत असतात. बंद असलेल्या जिल्हा परिषद शाळांत साप, विंचवांचा वावर वाढल्याने याचा धोका विद्यार्थ्यांना व शाळेच्या आवारात खेळणाऱ्या बालकांना आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

वर्ग खोल्यांमधील धूळ हटेना

गत दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थी घरीच आहेत. विद्यार्थ्यांनी मागील दोन वर्षांपासून आपल्या वर्ग खोल्या पाहिलेल्या नाहीत. त्या वर्गखोल्यांमध्ये आता धुळीचे साम्राज्य पसरले आहे.

वर्गातील डेस्क, बेंचवर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. शाळाच बंद असल्याने त्या शाळा स्वच्छ करण्याचा मानस कुणी ठेवला नाही. धूळ आणि वर्गात पसरलेले जाळे हे त्या वर्गखोल्यांची विदारक स्थिती आहे.

जबाबदारी कुणाची?

काही शाळेत साप, विंचवांनी पकडलेली जागा, याला शाळा प्रशासन जबाबदार असले तरी शाळेत असलेले परिचरपद शासनाने कमी केल्याने वर्गात जमलेली धूळ आता मुख्याध्यापकांनी स्वच्छ करावी का, हा प्रश्न उपस्थित होतो.

शाळेत साठलेला कचरा काढण्यासाठी किंवा बंद असलेल्या शाळा सुसज्ज करण्यासाठी शासनाने निधी दिलेला नाही. या शाळेची स्वच्छता करण्यापासून शाळेचे साहित्य निकामी झाले. दुरुस्ती करण्याचा भार मुख्याध्यापकांवरच टाकला जातो. मुख्याध्यापक शाळेला सजविण्यासाठी किती पैसे खर्च करणार काय? असा प्रश्न आहे.

इयत्ता ८ ते १२वीच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू आहेत. परंतु काही वर्ग १ ते ७ च्या शाळा आजही बंद आहेत. विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू नसली तरी शाळा शिक्षकांसाठी सुरू आहेत.