शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सायबर हल्ल्याच्या धोक्याबाबत दिला होता इशारा

By admin | Updated: May 18, 2017 00:34 IST

सध्या जगभरात गाजत असलेल्या रॅन्समवेअर या हल्ल्याबाबत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी वर्षभरापूर्वीच संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.

नाना पटोलेंनी विचारला प्रश्न : उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरल्याची हमीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या जगभरात गाजत असलेल्या रॅन्समवेअर या हल्ल्याबाबत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी वर्षभरापूर्वीच संसदेत प्रश्न उपस्थित केला होता.लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत दिनांक ११ मे २०१६ रोजी पटोलेयांनी सायबर हल्ल्याबाबत मुद्दा उपस्थित केला. यात त्यांनी म्हटले होते. प्रसार माध्यमांद्वारे पुढे आलेल्या माहितीनुसार आरआरसीटीसी या भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरील ‘डेटा हॅक’ करण्यात आला. यामध्ये जवळ पास १ कोटी ग्राहकांना ‘डेटा हॅक’ करण्याची भीती त्यांनी वर्तविली होती. या संकेतस्थळावर कोट्यवधी रुपयांची देवाण घेवाण करण्यात येते. आॅनलाईन रेल्वे तिकीट काढण्यासाठी आधारकार्ड, क्रेटीड कार्ड, डेबीट कार्ड आणि नेटबँकींगची माहिती ग्राहकांकडून पुरविण्यात येते. वेबसाईट ‘हॅक’ झाल्यास ग्राहकांची महत्वपूर्ण माहिती चोरल्या जाऊ शकते याचा विविध महत्वपूर्ण सेवांवर परिणाम होवू शकतो असा प्रश्न उपस्थित पटोले यांनी उपस्थित केला होता.पटोले यांनी १८ नोव्हेंबर २०१६ रोजी लोकसभेत अतारांकीत प्रश्नाद्वारे भारतीय ब ँकींग क्षेत्रावरील सायबर हल्ल्याशी निगडीत प्रश्न उपस्थित केला होता. यात त्यांनी म्हटले होते. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्याही मोठ्या सायबर हल्ल्याशी सामना करण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने कोणत्या उपाययोजना आहेत असा प्रश्न विचारला होता. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी, देशात कोणत्याही मोठ्या सायबर हल्ल्याचा सामना करण्यासाठी सायबर संकट व्यवस्थापन दलाची स्थापना करण्यात आली आहे. बँकींग परिवेक्षणासाठी सीईआरटीआयएन च्या मदतीने शासन बँकेमधील सुरक्षेबाबत पडताळणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पटोले यांनी १२ एप्रिल २०१७ रोजी लोकसभेत तारांकीत प्रश्नाद्वारे मुद्दा उपस्थित करून भारतातील अणू उर्जा संस्थावर आतंकवादी किंवा सायबर हल्ला झाल्यास याचा सामना करण्यासाठी काय उपाययोजना, असा प्रश्न विचारला होता. अणू उर्जा संस्थांमध्ये उत्तम दर्जाची आंतरीक व बाह्य सुरक्षा स्थापित करण्यात आल्याचे तसेच, सायबर हल्ल्याला परतवून लावण्यासाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्याचे उत्तर प्रधानमंत्री कार्यालयाचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी दिले होते.