शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा कोट्यवधीचा निधी उपयोगाविना

By admin | Updated: July 22, 2014 23:52 IST

मागील १९ वर्षापासून तयार होत असलेल्या निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी यावर्षीही शेतीला सिंचनासाठी मिळणार नसल्याची माहिती समोर आली असून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प आता शाप ठरत आहे.

संजय साठवणे - साकोली मागील १९ वर्षापासून तयार होत असलेल्या निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी यावर्षीही शेतीला सिंचनासाठी मिळणार नसल्याची माहिती समोर आली असून शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प आता शाप ठरत आहे. मागीलवर्षी या प्रकल्पाचे पाणी अडविल्यामुळे यावर्षी हा प्रकल्प सिंचनाच्या कामात येणार अशी शेतकऱ्यांना आशा होती. मात्र ती आशा आता निराशात बदलली आहे.निम्न चुलबंद प्रकल्प कुंभली गावाजवळ दुर्गाबाई डोहच्या बाजूला चुलबंद नदीवर बांधण्याचे काम करण्यात आले असून या निम्न चुलबंद प्रकल्पाला १९९५ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. तेव्हापासून या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असून आज १९ वर्षाचा कालावधी लोटला तरी हा प्रकल्प पाणी अडवून शेतीसाठी सिंचन क्षमता देण्यास असमर्थ ठरला आहे. या प्रकल्पात एकूण सात दरवाजे बसविण्यात आले असून या प्रकल्पाच्या पाण्यातून २३ गावातील एकूण ५ हजार ९९७ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. तसेच या पाण्यातूनच १९ गावांना पिण्याच्या पाण्याची सोयही होणार असे प्रस्तावित करण्यात आले आहे.मागील १९ वर्षापासून या प्रकल्पाचे काम कासवगतीने सुरू असून कधी राजकीय अडथळे तर कधी निधीची कमतरता अशा अडचणीमुळे हा प्रकल्प लडखडत राहिला. ऐनकेनप्रकारे या प्रकल्पाचे सातही दरवाजे लावण्यात आले व मागीलवर्षी या प्रकल्पात पाणी अडविण्यात आले. पाणी अडवताच शेतकऱ्यांनी टाहो फोडला.त्याला कारणही तसेच होते. पाणी अडवल्यामुळे शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली बुडाली. पिकाचे नुकसान झाले.या प्रकल्पावर आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा खर्च करण्यात आला असला तरी १९ वर्षाच्या या कालावधीत हा प्रकल्प अपूर्ण असून शासनाचा कोट्यावधीचा निधी शेतकऱ्यांच्या कामात अजूनपर्यंत आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाने यावर्षी या प्रकल्पाचे काम पूर्ण करुन शेतकऱ्यांना सिंचनाची सोय करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.