शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 00:30 IST

जलयुक्त शिवार अभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्हयातील ५६ गावे निवडण्यात आली.

जिल्हाधिकारी चौधरी : जलयुक्त शिवार अभियान कार्यशाळाभंडारा : जलयुक्त शिवार अभियान सन २०१७-१८ अंतर्गत जिल्हयातील ५६ गावे निवडण्यात आली. असून लोकसहभागातून शास्त्रोक्त पद्धतीने आराखडा तयार करण्यात यावा, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केल्या.जलयुक्त शिवार सन २०१७-१८ चा गाव आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने जिल्हयातील सर्व यंत्रणांची कार्यशाळा जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे आयोजित करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यशाळेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपवन संरक्षक उमेश वर्मा, उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी डॉ. नलिनी भोयर उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले की, अभियान राबवितांना जास्तीत जास्त लोकसहभागावर भर देण्यात यावा. गावातील शिवार फेरी आटोपलेली तसेच अजून बाकी आहे. त्या गावांचा शास्त्रोक्त पध्दतीने आराखडा तयार करा. पाण्याचा ताळेबंद तयार करा. अडचणी आल्यास तालुका कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधा. सर्वांनी गाव पातळीवर चमू तयार करावी. या ५६ गावांमध्ये जी जलयुक्त शिवारची कामे होणार आहे. त्यांची पाहणी करण्यात येईल, असेही ते म्हणाले. या कामांसाठी स्पर्धात्मक वातावरण तयार करावे व जास्तीत जास्त फायदा करुन घ्यावा, जी गावे चांगली कामे करतील त्या गावांना पारितोषिक देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी रब्बीमध्ये चांगले नियोजन केले तर चांगले उत्पादन येऊ शकते. शिवार फेरी ज्या गावात झाले नसतील तर ते करावे. जलयुक्त शिवार अभियानाचे आराखडे १० मार्चपर्यंत जिल्हास्तरीय समितीकडे सादर करावे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविकात डॉ. नलिनी भोयर यांनी भू-गभार्तील पाण्याच्या पातळीत वाढ करणे, पाणी उपलब्ध करणे, विकेंद्रीत पाणी साठे निर्माण करणे या बाबत माहिती दिली. तसेच अस्तित्वात असलेले व निकामी असलेले पाण्याचे स्त्रोत याबाबत जाणीव जागृती करणे, पाणलोट विकासाची कामे सिनाबां, विहिर पुनर्भरण, कालवा दुरुस्तीची कामे करावयाची असल्याचे त्यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियान तंत्रशुध्द पध्दतीने राबविण्यासाठी पाण्याचा ताळेबंद तयार करणे आवश्यक आहे. तसेच नव्याने कामे हाती घेवून ते आराखडयात घ्यावे, दुरुस्तीची कामे सुध्दा यात घ्यावे, असे त्या म्हणाल्या. जलयुक्त शिवार अभियानात सन २०१५-१६ मध्ये वर्षी ८६ गावे तर सन २०१६-१७ मध्ये ५९ गावे निवडली होती. तसेच सन२०१७-१८ मध्ये ५६ गावे निवडण्यात आली असून आतापर्यंत एकूण ३७ हजार ७५५ टिसीएम पाणी साठा निर्माण झाला आहे व १६ हजार ५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेत तांत्रिक पध्दतीने जलयुक्त शिवार अभियानाची कामे व्हावीत यादृष्टीने तालुका कृषि अधिकारी किशोर पात्रीकर व वरीष्ठ भूवैज्ञानिक श्री. भुसारी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. उपस्थित सरपंचांनी त्यांच्या समस्या मांडल्या, त्यांचे निराकरण करण्यात आले. या कार्यशाळेकरीता वनपाल, ग्रामसेवक, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक व शाखा अभियंता, सरपंच उपस्थित होते. (प्रतिनिधी)