जिल्हा पाेलिसांची क्रॅक डाऊन माेहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:45+5:302021-06-09T04:43:45+5:30

जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात २८ मे ते ३ जूनपर्यंत ही माेहीम राबविण्यात आली. याअंतर्गत अवैध दारूचे ...

Crackdown campaign of District Police | जिल्हा पाेलिसांची क्रॅक डाऊन माेहीम

जिल्हा पाेलिसांची क्रॅक डाऊन माेहीम

जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनात २८ मे ते ३ जूनपर्यंत ही माेहीम राबविण्यात आली. याअंतर्गत अवैध दारूचे १३७ गुन्हे दाखल करून १३७ आराेपींना अटक करण्यात आली. दाेन वाहन, देशी विदेश दारू १७७ लिटर, माेहाफुलाची ११२५ लिटर दारू, ५६६१ किलाे माेहासडवा व इतर साहित्य जप्त केले. ७ लाख १२ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात ही माेहीम राबविण्यात आली आहे. यापुढेही अशीच माेहीम राबविण्यात येणार असून, गुन्हेगारांचा बिमाेड करण्यासाठी भंडारा जिल्हा पाेलीस दल सज्ज असल्याचे पाेलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले. पाेलिसांच्या या माेहिमेने दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले असल्याचे दिसत आहे.

Web Title: Crackdown campaign of District Police