शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

कोरंभी-बेला मंजूर रस्ता बांधकामाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:01 IST

पर्यटन विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोरंभी-बेला रस्त्याला शासनाने मंजूरी दिली असून आता हा रस्ता बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.

ठळक मुद्देरायुकाँचा पाठपुरावा : पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार मार्ग

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पर्यटन विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या कोरंभी-बेला रस्त्याला शासनाने मंजूरी दिली असून आता हा रस्ता बांधकामाच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.कोरंभी येथे पर्यटन स्थळ आणि कोरंभी मातेचे प्रसिध्द देवस्थान आहे. त्याठिकाणी पर्यटकांची आणि भक्तांची मोठी वर्दळ असते. तसेच हा परिसर शैक्षणिक परिसर म्हणून ओळखला जाते. त्यामुळेही या रस्त्यावर मोठी गर्दी असते. तसेच शेतकऱ्यांसाठी ही हा माग्र महत्वपूर्ण आहे. मात्र गत काही वर्षांपासून या रस्त्याची दयनिय अवस्था झाली होती. सर्वांचा याचा त्रास सहन करावा लागत होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरुन बेला येथून जाणारा जवळचा मार्ग असल्याने नागरिक त्याचाच उपयोग करीत होते. या रस्त्याची झालेली दयनिय अवस्था जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे यांच्या निदर्शनासाठी त्यांनी या रस्त्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकामचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार करुन सातत्याने पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले. विशेष अर्थसंकल्पात यासाठी निधी मंजूर झाला असून विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत या रस्त्याचे काम केले जाणार आहे. मात्र मंजूरी मिळाल्यानंतरही अद्याप कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे रस्त्याचे काम तात्काळ सुरु करावे अशी मागणी आहे.गणेशपूर कोरंभी रस्त्याचे काम दिवाळीनंतरभंडारा शहरातील गणेशपूर ते कोरंभी या रस्त्याचे काम दिवाळीनंतर सुरु होणार आहे. दोन कोटी ६१ लाख रुपयांचा या रस्त्यात गणेशपूर व कोरंभी येथे सिमेंटचा रस्ता आणि गणेशपूर येथे नालीचे बांधकाम होणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून निधी मंजूर झाला असून रस्त्याची निवीदा प्रक्रिया सुरु असल्याचे कनिष्ठ अभियंता वैद्य यांनी सांगितले.