शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
3
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
4
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
5
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
6
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
7
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
8
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
9
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
10
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
12
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
13
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
14
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
15
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
16
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
17
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
18
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
19
"निवडणुका जिंकण्यासाठी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली..."; काँग्रेसचा टोला
20
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम अर्धवट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 05:00 IST

सिहोरा परिसरातील चुल्हाड गावात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात आरोग्य उपकेंद्र संचालित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या उपकेंद्रातील नुतनीकरण करण्यास सुरुवात केली आहे. निविदा अंतर्गत एका कंत्राटदाराला ही संपुर्ण कामे देण्यात आली आहेत.

ठळक मुद्देकंत्राटदाराचा पोबारा : सरपंचाची तक्रार, हरदोली येथील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : प्राथमिक आरोग्य केंद्र चुल्हाड अंतर्गत हरदोली गावातील आरोग्य उपकेंद्राचे अर्धवट बांधकाम सोडून कंत्राटदारांनी साहित्याची उचल केली आहे. या संदर्भात मुख्य कार्यपालन अधिकारी याच्याकडे सरपंच नितीन गणविर यांनी तक्रार केली आहे.
सिहोरा परिसरातील चुल्हाड गावात असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावात आरोग्य उपकेंद्र संचालित करण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने या उपकेंद्रातील नुतनीकरण करण्यास सुरुवात केली आहे. निविदा अंतर्गत एका कंत्राटदाराला ही संपुर्ण कामे देण्यात आली आहेत. आरोग्य उपकेंद्रात जुन्याच कामांना तोडून नविनीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात आल्याने मार्च महिन्यात सरपंचानी विरोध केला होता. आरोग्य उपकेंद्र व प्रसुती कक्ष दर्जेदार असताना पुन्हा त्याच कामांना मंजुरी देण्यात आल्याने सरपंच आणि कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भुवया उंचाविल्या होत्या. आरोग्य उपकेंद्रात अनेक साहित्यांचा अभाव असतांना त्या सोडविल्या जात नाहीत. यामुळे ग्रामीण महिलांना सेवा मिळताना अडचणीचे ठरत आहे. पंरतु वातानुखोलीत बसुन वरिष्ठ अधिकारी अंदाजपत्रक तयार करतात.
निधी लाटण्याचा आरोप करीत हा प्रकार जिल्हा परिषद सदस्या प्रमिला कटरे यांनी जिल्हा परिषद सभागृहात मांडला होता. या विषयावर वादग्रस्त चर्चाही झाली होती. यानंतर आरोग्य विभागाचे उपविभागीय अभियंता लेदे यांनी प्रत्यक्ष हरदोली गावातील आरोग्य उपकेंद्रांनी भेट देवून पाहणी केली होती. उपकेंद्राचे कामे करतांना गावातील सरपंच आणि आरोग्य विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना विश्वासात घेण्यात आले नाही. असा ठपका ठेवण्यात आला होता. यावेळी उपविभागीय अभियंता लेदे यांनी सरपंच व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेवून कामे करण्याचा सुचना दिल्या होत्या. परंतु कामे करतांना विश्वासात घेण्यात आलेले नाही. या शिवाय आरोग्य उपकेंद्राचे कामे पुर्ण करण्यात आली नाही. रंगरंगोटी करण्यात आली नाही ही सर्व कामे सोडून कंत्राटदाराने साहित्यासह पोबारा केला आहे.
साहित्य नेत असतांना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु कामे पुर्ण झाले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गावात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान सरपंच नितीन गणविर यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना तक्रार केली असतानाही आजपर्यंत या तक्रारीची दखलही घेण्यात आली नाही. या परिसरातील मोहाडी (खापा) गावातील आरोग्य उपकेंद्राचे अशीच अवस्था झाली आहे. विकास कार्यात गोंधळ सुरु असल्याची तक्रार सरपंच सुनिल माने यांनी सुध्दा दिली होती. परंतु यंत्रणा या तक्रारींवर गंभीर असल्याचे दिसत नाही. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा करिता नागरिक त्रस्त झाले असताना यंत्रणा बोजवारा करीत असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

हरदोली आरोग्य उपकेंद्रात अर्धवट बांधकाम सोडून कंत्राटदाराने साहित्यासह पोबारा केला आहे. या आशयाची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी यांना चौकशी व कारवाई करिता तक्रार दिली आहे. मात्र दुर्लक्ष होत आहे.
- नितीन गणविर,
सरपंच हरदोली

टॅग्स :Socialसामाजिक