शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसतर्फे ५० हजार कुटुंबांना मदत पोहचविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : जिल्ह्यात कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यात जवळपास पन्नास हजार कुटुंबांपर्यंत सदर अन्न धान्य ...

ठळक मुद्देलॉकडाऊनचा अनेकांना फटका : जिल्हा काँग्रेस कमिटीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही. जिल्ह्यात जवळपास पन्नास हजार कुटुंबांपर्यंत सदर अन्न धान्य लॉकडाऊन वाढल्यास टप्प्याटप्याने पोहचविण्यात येतील. पहिली खेप प्रत्येक जिल्हा परिषद क्षेत्रानुसार पाठविण्यात आली आहे. अति गरजूंच्या घरी शिधा किट पोहोचत्या करून सदर मदत करण्यात येणार आहे, असा निर्धार जिल्हा काँग्रेसने घेतला आहे.जगात आणि देशभरात कोरोना विषाणुने थैमान घातले असूना सरकारने लॉकडाउनचे आदेश जारी केले असतांना अनेक व्यापार, उद्योगधंदे बंद आहेत. यादरम्यान रोज मजूरी करणारे मजुर मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. या कालावधीत मजुरीअभावी अनेकांवर उपासमारीचे संकट परिसरात बघायला मिळत होते.अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अखिल भारतीय महासचिव मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळा थोरात यांच्या आदेशानुसार तसेच विधासभेचे अध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री सुनील केदार, राज्यमंत्री विश्वजित कदम, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांच्या सहकार्याने काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी यांनी जिल्हा स्तरावर प्रत्येक तालुक्यातील गोरगरीब मोलमजुरी करणारे कुणीही व्यक्ती लॉकडाउन दरम्यान उपाशीपोटी राहु नये यासाठी जिवनावश्यक वस्तुचा पुरवठा सुरु करण्यात आला आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, तालुकाध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, धनराज साठवणे, महेंद्र निंबार्ते, अनीक जमा पटेल, मुकुंद साखरकर, दिलीप निखाडे, प्रशांत देशकर, धर्मेंद्र गणवीर, नाहिद परवेझ, पवन वंजारी, मंगेश हुमणे, सचिन फाले, शाहीन मून आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेस