शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं, तर...; प्रकाश आंबेडकरांनी सांगितली 'अंदर की बात'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2024 10:10 IST

भंडारा येथील पहिल्याच सभेत आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर थेट भाष्य केलं. 

भंडारा/मुंबई - लोकसभा निवडणूकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना भाजपाने १९५ जागांवर उमेदवारांची घोषणाही केली. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचं जागावाटपच अद्याप झालेलं नाही. त्यात, वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यावरुन जागावाटप निश्चित होत नाही. प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या जागांची मागणी महाविकास आघाडीला अद्याप तरी मान्य नसल्याची चर्चा आहे. त्यामुळेच, अजूनही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत येईल की नाही, यावर प्रश्नचिन्हच आहे. त्यातच, प्रकाश आंबेडकरांनी जाहीर संभांना सुरुवात केली. भंडारा येथील पहिल्याच सभेत आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर थेट भाष्य केलं. 

बहुजन सारे एक होऊया, सत्ता आपल्या हाती घेऊया... अशा बॅनरखाली भंडारा येथे बहुजन अधिकार महासभेतील जाहीर सभेतून प्रकाश आंबेडकरांनी भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकावर हल्लाबोल केला. तसेच, महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागावरही भाष्य केलं. काँग्रेस शिवसेनेत १० जागांवरुन भांडणं सुरू आहेत. तर, काँग्रेस आणि एनसीपी यांच्यात ५ जागांवरुन भांडणं सुरू आहेत. म्हणजेच, ४८ पैकी १५ जागांवरुन महाविकास आघाडीतील पक्षांची भांडणं सुरू आहेत. पण, माध्यमांत वंचित बहुजन आघाडी बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप आम्ही बाहेर पडण्याचा निर्णय घेतला नाही, हे मी सांगतो. आमच्यासाठी चर्चा कधी सुरू होईल, त्यांची भांडणं संपल्यानंतर. आता, त्यांचीच भांडणं सुरू झाली नाहीत, तर आमच्याशी चर्चा काय होणार आहे, असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीतील जागावाटपाची अंदर की बात सांगितली. 

१२ ते १६ मार्च दरम्यान आचारसंहिता लागू होईल. आज ४ मार्च, किती दिवस शिल्लक राहिले आहेत. आता, यांचं भांडण मिटलं नाही तर, मग काय. मी अपेक्षा करतो की, ह्यांचं भांडण मिटेल आणि आमच्यासोबत चर्चा सुरू होईल, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

आपल्यात एकच गोष्ट समसमान

हा लढा महत्त्वाचा आहे. मतदानातून हा लढा लढायचा आहे. त्यामुळेच, आम्ही एकत्र येण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करणार आहोत. पण, जर हे शक्य झालं नाही तर निराश व्हायचं नाही, ताकद गळल्यासारखं व्हायचं नाही. त्यांना आपण बरोबर घेत आहोत, काहींना भाजपाने हाकललंय म्हणून ते वेगळे झाले आहेत. काहींना तुरुंगात जाण्याची भीती आहे, म्हणून ते आपल्यासोबत आहेत. त्यांचा अजेंडा त्यांच्याकडे, आपला अजेंडा आपल्याकडे. मात्र, या दोन्ही अजेंड्यातून एकच गोष्ट समसमान आहे, ती म्हणजे त्यांनाही भाजपा आणि आरएसएसचं सरकार नको आहे, आणि आपल्यालाही भाजपा व आरएसएसचं सरकार नको आहे, असे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले.  

जितेंद्र आव्हाडांचं पत्र

वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू आहे, ते आमच्यासोबत महाविकास आघाडीमध्ये असतील, असे शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी म्हटले. तर, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन पत्र लिहून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबतच यावे, असा आग्रह केला आहे. संविधान आणि लोकशाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले अमूल्य धन आहे. जर या संविधानाला हात लावला गेला तर पुढील पिढी आपणाला कधीच माफ करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर समविचारी पक्षांसोबत एखादी बैठक घेऊन महाराष्ट्रात एक वेगळा संदेश दिला जाईल, यासाठी आपण प्रयत्न करूया ! जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, असे जितेंद्र आव्हाड यांनी आंबेडकरांना उद्देशून म्हटलं आहे. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस