शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सालेभाटा सिंचन प्रकल्प पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 05:00 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांच्या समवेत विधानभवनात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष जयस्वाल, प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांना विविध निवेदनातून शेतकºयांसमोर असलेल्या समस्या निदर्शनास आणून देण्यात जिल्ह्यातील आमदारांना लेखी निवेदन देवून विधानभवनात तालुक्यातील सिंचन प्रकल्प तसेच धान पिकासंबंधी विविध उपाययोजना करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देछत्रपती शेतकरी संघटनेची मागणी : नरेंद्र भोंडेकरांना शेतकऱ्यांचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखनी : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी शेतमजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नागपूर येथील विधानभवनात आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत अनेक राष्ट्रीय नेत्यांची चर्चा केली. यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मांडण्यात आल्या. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांच्या समवेत विधानभवनात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, आशिष जयस्वाल, प्रहार संघटनेचे संस्थापक तथा आमदार बच्चू कडू यांना विविध निवेदनातून शेतकºयांसमोर असलेल्या समस्या निदर्शनास आणून देण्यात जिल्ह्यातील आमदारांना लेखी निवेदन देवून विधानभवनात तालुक्यातील सिंचन प्रकल्प तसेच धान पिकासंबंधी विविध उपाययोजना करण्यासंबंधी निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष मनोज पटले यांनी शेतकºयांना पीक विम्याची रक्कम मिळाली असली तरी बँका कर्जखात्यात वळते करीत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात निराशा पडत असल्याने बँकांना त्वरित निर्देश देण्याची यावेळी आमदारांकडे मागणी करण्यात आली. तसेच मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होऊन देखील शेतकºयांना धानाचे विक्रीसाठी मोठी कसरत करावी लागत असल्याने शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र वाढविण्याची गरज असल्याचे यावेळी आमदार भोंडेकर यांनी वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून दिले.
अनेक ठिकाणी धान काट्यावर शेतकºयांची लुबाडणूक होत असल्याने अशा धान केंद्रावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी निवेदनातून केली. यावेळी जलसंवर्धन उपसा सिंचन मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करचखेडा उपसा सिंचन धारगाव टप्पा २ चे सालेभाटा उपसा सिंचनचे काम पूर्ण करण्याची मागणी करुन १५० गावांना सुविधा मिळणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी संघटनेद्वारे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, विरोधी पक्षनेते विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेवून शासनाने धानाला ७०० रुपये बोनस, दोन लक्ष रुपयापर्यंत कर्जमाफीचा निर्णय घेवून शेतकºयांना न्याय दिल्याने संघटनेतर्फे सरकारचे आभार मानन्यात आले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी अशोक पटले, संदीप क्षिरसागर, नुतन ठाकरे, नंदु काडगाये, धनपाल बोपचे, मोरेश्वर वंजारी, प्रमोद कापगते, योगेश रहांगडाले, कृष्णा खंडाईत, सहदेव मांढरे, राकेश भोस्कर, चिंतामण कोडवते यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक