शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

संविधानाच्या रक्षणाकरिता बहुजनांनो एकत्र या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:58 IST

बहुजनांच्या न्याय हक्काकरिता माझी लढाई सुरु झाली आहे. संविधानीक अधिकारावर गदा आणण्याचे कटकारस्थान सरकार करीत आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : संविधानदिनी बहुजनांना आवाहन

आॅनलाईन लोकमतपालांदूर : बहुजनांच्या न्याय हक्काकरिता माझी लढाई सुरु झाली आहे. संविधानीक अधिकारावर गदा आणण्याचे कटकारस्थान सरकार करीत आहे. शाहु, फुले, आंबेडकरी जनतेला संविधान हक्कापासून दुर नेले जात आहे. या अन्यायाविरोधात मला लढण्याचे बळ तुमच्यातुन मिळत आहे. संविधान दिनाच्या निमित्ताने संविधानाच्या रक्षणाकरिता आपण बहुजनांना एकत्र यायचे आहे. असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी बहुजानांना केले आहे.पालांदूरात शहिदांच्या स्मरणार्थ श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. मचांवर जेष्ठ नेते दामाजी खंडाईत, सरपंच जितेंद्र कुरेकार, पालांदूर, केशव बडोले कवलेवाडा, जि.प. सदस्य वर्षा रामटेके, उपसभापती विजय कापसे, तु.रा. भुसारी, उपसरपंच होमराज कापसे, उपसरपंच स्वप्नील खंडाईत, तंमुस अध्यक्ष केवळराम कापसे, प्रगतशिल शेतकरी श्रावण सपाटे, ठाणेदार अंबादास सुणगार, माजी जि.प. सदस्य प्रतिभा सेलोकर, माजी सरपंच वैशाली खंडाईत आदी मान्यवर उपस्थित होते.पालांदूर सामाजिक भावनेने झपाटलेले गाव असून शहिदांना श्रध्दांजली देण्याकरिता सामुहिकतेने पुढे येण्याचे धाडस मागील नऊ वर्षापासून करीत आहे हे भंडारा जिल्हावाशीयांकरिता सौभाग्य आहे. म्हणून आयोजक भरत खंडाईत व मित्र परिवाराचे कौतुक केले.या ठिकाणी संविधान दिनानिमित्ताने जिल्हा परिषद शाळा खराशीचा विद्यार्थी चिमुकला निधीश बोंदे याने संविधानाचे वाचन करीत इतरानाही संविधानाचे शपथ दिली. राष्टÑसंत तुकडोजी व गाडगेबाबा यांच्या पुर्णाकृती पुतळ्यांना वर्षभर स्वच्छेने स्वच्छ ठेवणारी मिरा खोडकर या भगीणीचा साडी चोळी देवून खा. नाना पटोलेंच्या हस्ते सन्मान करण्यात आला.शहिदांना पुष्पचक्र व पुष्पमाला वाहून श्रध्दांजली वाहण्यात आली. यश खंडाईत या विद्यार्थ्याने हरियाणा येथे राष्टÑीय खेळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबाबद त्याला सुवर्ण पदकाने सन्मानित केले. प्रास्ताविकात भरत खंडाईत यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांनी नवनिर्मित साईमंदिराचे साईचे पुजन केले. राष्टÑसंत तुकडोजी व गाडगेबाबांना अभिवादन केले. ग्रामपंचायत कवलेवाडा अंतर्गत खासदार निधीतून सुशिक्षीत तरुणांकरिता उभारलेल्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन करीत तरुणांना यथोचित मार्गदर्शन करीत प्र्रयत्नवादी होण्याचे बळ पटोले यांनी दिले.कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद शाळा खराशीचे मुख्याध्यापक मुबारक सय्यद यांनी केले. कार्यक्रमाकरिता संगित शिक्षक भाष्कर पिंपळे, नितीन रणदिवे, शामा बेंदवार, कृष्णाजी जांभुळकर, मोरेश्वर खंडाइत, ईश्वर तलमले, भोजराम तलमले, डॉ. बिरे, निलकंठ खंडाईत, केशव कुंभरे, रत्नाकर नागलवाडे, प्रमोद हटवार तथा पालांदूर, कवलेवाडा, मेंगापूर जनतेनी सर्व सहकार्य केले.कार्यक्रमाला शेकडो नागरिक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.