कोंबडा बाजारावर धाड

By Admin | Updated: August 22, 2016 00:23 IST2016-08-22T00:23:38+5:302016-08-22T00:23:38+5:30

धारगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या डव्वा येथे कोंबडा बाजारावर पोलिसांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास धाड घातली.

Cocktail on the market | कोंबडा बाजारावर धाड

कोंबडा बाजारावर धाड

सहा जणांना अटक : डव्वा येथील घटना
आमगाव दिघोरी : धारगाव पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या डव्वा येथे कोंबडा बाजारावर पोलिसांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास धाड घातली. यात सहा जणांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे कोंबडा झुंजीत सहभागी होणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत असे की, धारगाव परिसरात अनेक दिवसांपासून कोंबडा बाजार भरविण्यात येत असल्याची तक्रार भंडारा पोलिसांत करण्यात आली होती. कारवाईसाठी अनेकदा पोलिसांनी सापळा रचला. मात्र पोलिसांना यश येत नव्हते. आज सकाळी धारगाव पोलिसांना डव्वा येथे कोंबडा बाजार भरणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरुन भंडारा पोलिसांनी धारगाव पोलिस चौकीवर सुचना केली. त्यानंतर धारगाव चौकीचे कर्मचारी डव्वाकडे रवाणा झाले. कारवाई करण्यापुर्वी गोपनियता बाळगण्यात आली.
पोलिसांनी कोंबडा बाजारावर धाड घातली असता. अनेक नागरिक सैरावैरा पळू लागले. पोलिसांना यात सहा जणांना ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द मुंबई जुगार कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला. यांच्या ताब्यातून दोन कोंबडे व रोख २,५९५ रुपये जप्त करण्यात आले.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोंबडा बाजार भरत असल्याची माहिती पोलिसांना आहे. मात्र कारवाई नाममात्र होत असल्याने जुगाऱ्यांचे मनोबल वाढले आहे. (वार्ताहर)

Web Title: Cocktail on the market