शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

सनफ्लॅग कंपनीतील संप टळला

By admin | Updated: October 21, 2014 22:47 IST

सनफ्लॅग कंपनीतील कामगारांचा दिवाळी बोनस सानुग्रह अनुदानाचा रखडलेला प्रश्न सोडविण्यात संघटनेला यश आले आहे. दिवाळीपूर्वी सर्व कामगारांना त्यांच्या पगारश्रेणीनुसार २३ हजार ५०० रुपयाचा बोनस

वरठी : सनफ्लॅग कंपनीतील कामगारांचा दिवाळी बोनस सानुग्रह अनुदानाचा रखडलेला प्रश्न सोडविण्यात संघटनेला यश आले आहे. दिवाळीपूर्वी सर्व कामगारांना त्यांच्या पगारश्रेणीनुसार २३ हजार ५०० रुपयाचा बोनस देण्यात येणार आहे.यामुळे संघटनेने पुकारलेले संप मागे घेण्यात आल्याची माहिती सनफ्लॅग आयर्न एन्ड स्टील मजदूर सभाचे कार्यकारी अध्यक्ष मिलिंद वासनिक यांनी दिली.सनफ्लॅग आयर्न अ‍ॅन्ड स्टिल कंपनीत २१०० कामगार कार्यरत आहेत. यात ९०० स्थायी व १२०० कंत्राटी कामगारांचा समावेश आहे. कार्यरत कामगारांना दर तीन वर्षांनी पगारवाढ व दिवाळीपूर्वी बोनस देण्यात येते. पगारवाढ व सानुग्रहराशी संबंधात तीन वर्षापूर्वी झालेला करार संपुष् टात आला होता. यामुळे नियमित पगारवाढ व दिवाळी बोनस या संदर्भात पाच महिन्यापासून सनफ्लॅग व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात चर्चा सुरु होती. १७ तारखेला नागपूर येथे व्यवस्थापक कंपनीचे मालक भारद्वाज, मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के. गुप्ता, महाप्रबंधक प्रभाकर कोल्तेवार, सहमहाप्रबंधक सतीश श्रीवास्तव व संघटनेचे सरचिटणीस मिलिंद देशपांडे, कार्यकारी अध्यक्ष मिलिंद वासनिक, महासचिव किशोर मारवाडे, उपाध्यक्ष विजय बांडेबुचे, विजेंद्र नेमा, महेश बर्वेकर, विकास फुके, रविंद्र बोरकर, संघटन सचिव अमोद डाकरे, ज्ञानेश्वर वंजारी, रमेश बालपांडे, मारवाडे, धर्मदाय यादव, शिवकुमार सार्वे, कंत्राटी कामगार संघाचे महोम्मद जावेद, मनोहर डोंगरे, संतोष बालपांडे, शैलेंद्र बन्सोड, तारीकराम रामटेके, अम्रृत साखरवाडे, सर्वनदास चिपळूनकर व रविंद्र मिश्रा यांच्यात बैठक झाली. यावेळी कंपनी व्यवस्थापनाने कंपनीला झालेले नुकसान याबाबत माहिती दिली.उच्च न्यायालयाच्या निर्णयाने कंपनीचे कोळसा खाण रद्द झाले. यामुळे कंपनी व्यवस्थापनाला करोडो रुपयाचे नुकसान झाले. यामुळे कामगारांना एकाकी पगारवाढ व बोनस देणे शक्य नाही. तात्पुरता दिवाळी पूर्वी बोनस म्हणून गतवेळेपेक्षा १००० रुपये वाढ करून दिवाळीपूर्वी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पगारवाढ संबंधात चर्चा सुरु राहुन लवकरच निर्णय घेण्यात येईल अशी हमी सनफ्लॅग कंपनीच्या व्यवस्थापन कामगार संघटनेला दिली आहे. त्यामुळे सनफ्लॅग आयर्न एन्ड स्टील मजदूर सभेच्या वतीने पुकारलेला संप तात्पुरता मागे घेतला आहे. (वार्ताहर)