शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
2
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
3
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
4
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
5
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
6
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
7
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
8
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
9
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
10
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
11
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
12
तामिळनाडूचा तिढा सुटला; 'टीव्हीके'ने जुळवले बहुमताचे समीकरण, विजय होणार नवे मुख्यमंत्री 
13
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
14
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
15
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप सरकार स्थापन, पंतप्रधानांसह एनडीएच्या २० मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
17
अनिल अंबानींच्या एडीए समूहावर छापा; 'सर्च वॉरंट'च्या आधारे कारवाईचा बडगा
18
हंटाव्हायरस : जहाज स्पेनला आज पोहोचेल; १४०हून अधिक प्रवासी आणि कर्मचारी
19
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
20
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धानाने चुलबंद खाेरे हिरवेकंच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 05:00 IST

पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १२०० हेक्टरवर उन्हाळी धानाचे नियाेजन करण्यात आले आहे. उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांना परवडण्यासारखा असताे. खरीपापेक्षा अधिक उत्पन्न येते. मात्र नर्सरीतील पऱ्हे कडाक्याच्या थंडीत जगविणे तसे कठीणच असते. थंडीने उन्हाळी धानाचे पऱ्हे अक्षरश: मरणासन्न अवस्थेत असतात. बुरशीनाशकापासून तर वाढ खुंटण्यापर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. बियाणे दुप्पट वापरावे लागतात.

ठळक मुद्देनववर्षात राेवणी : पऱ्हे हिरवे ठेवण्यासाठी मदनकर यांची नामी शक्कल

मुखरु बागडे
लोकमत न्यूज नेटवर्क
पालांदूर : खरीप हंगामाने दगा दिल्यानंतर पुन्हा नव्या आशेने शेतकरी उन्हाळी धानाच्या तयारीला लागले आहे. लाखनी तालुक्यातील चुलबंद खाेरे धान नर्सरीने हिरवेगार झाले असून, नववर्षात राेवणीला प्रारंभ हाेणार आहे. कडाक्याच्या थंडीतही पऱ्हे सुस्थितीत असून मऱ्हेगाव येथील वीरेंद्र मदनकर या शेतकऱ्याने पऱ्हे हिरवे ठेवण्यासाठी नवी शक्कल लढविली आहे.
पालांदूर मंडळ कृषी कार्यालयांतर्गत १२०० हेक्टरवर उन्हाळी धानाचे नियाेजन करण्यात आले आहे. उन्हाळी हंगाम शेतकऱ्यांना परवडण्यासारखा असताे. खरीपापेक्षा अधिक उत्पन्न येते. मात्र नर्सरीतील पऱ्हे कडाक्याच्या थंडीत जगविणे तसे कठीणच असते. थंडीने उन्हाळी धानाचे पऱ्हे अक्षरश: मरणासन्न अवस्थेत असतात. बुरशीनाशकापासून तर वाढ खुंटण्यापर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागताे. बियाणे दुप्पट वापरावे लागतात. अनेक ठिकाणी नर्सरीला आच्छादन करावे लागते. किमान ३० ते ४० दिवसाच्या कालावधीनंतर पऱ्हे राेवणीला तयार हाेतात. परंतु प्रयाेगशील शेतकऱ्यानी चुलबंद खाेऱ्यात चिखलटी पद्धतीने पऱ्हे टाकले. या पऱ्हांची वाढ आता जाेमाने हाेत आहे.
सध्या चुलबंद खाेऱ्यात नर्सरीमुळे हिरवेगार गालिचे पसरविल्याचे चित्र दिसून येते. सकाळी काेवळ्या उन्हात धान पऱ्हे मन माेहून टाकतात. धानाच्या पानावरील दवबिंदू आकर्षित करून घेतात. 

चिखलाटी पद्धत ठरली फायद्याची
लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील शेतकरी वीरेंद्र मदनकर यांचा चिखलाटी पद्धतीचा प्रयाेग सध्या चांगलाच फायद्याचा ठरत आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी आपले धान पऱ्हे जगविले आहे. या पद्धतीत जाेखीम आहे. परंतु जुन्या शास्त्राला नवा आयाम देत उन्हाळी धानाची नर्सरी हिरवीगार दिसत आहे. मकरसंक्रांतीच्या पर्वात चुलबंद खाेऱ्यात राेवणीला सुरुवात हाेईल. 

 

टॅग्स :agricultureशेती