वैनगंगेत उडी घेवून चपराशाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:17 IST2021-09-02T05:17:00+5:302021-09-02T05:17:00+5:30

संदेश वासुदेव खाेब्रागडे (३४) रा. शुक्रवारी वाॅर्ड पवनी असे मृताचे नाव आहे. ताे तालुक्यातील गाेसे बुज. येथील विनाेद विद्यालयात ...

Chaprasha commits suicide by jumping in Waingang | वैनगंगेत उडी घेवून चपराशाची आत्महत्या

वैनगंगेत उडी घेवून चपराशाची आत्महत्या

संदेश वासुदेव खाेब्रागडे (३४) रा. शुक्रवारी वाॅर्ड पवनी असे मृताचे नाव आहे. ताे तालुक्यातील गाेसे बुज. येथील विनाेद विद्यालयात चपराशी पदावर कार्यरत हाेता. बुधवारी सकाळी शाळेत जात असल्याचे सांगुन ताे निघून गेला हाेता. दुपारी १२ वाजताच्या सुमारास तो पवनी येथील वैनगंगा नदीच्या पुलावर आला. काही कळायच्या आता त्याने नदीपात्रात उडी घेतली. हा प्रकार तेथून जाणाऱ्यांना दिसला. त्यांनी आरडाआरोडा केला. मात्र नदीपात्रता पाणी अधिक असल्याने कुणाचीच हिम्मत झाली नाही. या घटनेची माहिती पवनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ नदीकडे धाव घेतली. ढिवर समाजाच्या पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांना पाचारण करण्यात आले. नदीपात्रात शोध मोहीम सुरू झाली. तब्बला दोन तासानंतर त्याचा मृतदेहच हाती आला. नगरसेवक सुधीर खाेब्रागडे यांचा ताे भाऊ हाेता. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

Web Title: Chaprasha commits suicide by jumping in Waingang