शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्रासाठी बसपा हाच पर्याय

By admin | Updated: October 11, 2014 01:15 IST

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष ताकदीनिशी रिंगणात आहे. उमेदवारी देताना कुठलाही दुजाभाव न करता सर्वच समाजातील घटकांना उमेदवारी दिली.

भंडारा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्ष ताकदीनिशी रिंगणात आहे. उमेदवारी देताना कुठलाही दुजाभाव न करता सर्वच समाजातील घटकांना उमेदवारी दिली. केंद्रात पुंजीपतींच्या बळावर सत्तेवर आलेल्या सरकारने त्यांच्याच हिताची धोरणे राबविणे सुरू केले आहे. महाराष्ट्रातील आघाडी सरकारने भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काही केले नाही. अशा वाटोळे करणाऱ्या आघाडी सरकारला दूर सारुन भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडवा, असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केले.भंडारा विधानसभा क्षेत्राच्या बसपाचे उमेदवार देवांगणा विजय गाढवे यांच्या प्रचारार्थ दसरा मैदानावर आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. मंचावर बसपाचे प्रदेश प्रभारी अ‍ॅड. विरसिंग, अ‍ॅड. सुरेश माने, जिल्हाध्यक्ष संजय गाढवे व उमेदवार उपस्थित होते. यावेळी त्या म्हणाल्या, विदर्भातील नागरिक अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी करीत असताना सत्ताधाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. तुम्ही बसपाला पूर्ण बहुमताने सत्ता द्या, आम्ही स्वतंत्र विदर्भ देऊ, अशी ग्वाही दिली. बसपा कार्यकर्त्यांच्या बळावर उत्तरप्रदेशात बहुजन समाज पक्षाने चारवेळा सत्ता मिळविली. या कार्यकाळात अनेक भरीव विकास कामे करण्यात आली. निराधारांना पक्की घरे बांधून देण्यात आली. भूमिहिनांना जमिनीचे पट्टे देण्यात आले. कायदा व सुव्यवस्थेची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यात आली. विविध योजनांद्वारे गरीबांना न्याय देण्यात आला. बेरोजगारांना रोजगार भत्ता देण्याऐवजी कायमस्वरुपी नोकरी दिली. सर्वजन सुखाय, सर्वजन हिताय, या धर्तीवर उत्तरप्रदेशला उत्तम सरकार दिले आहे. सोशल इंजिनियरींगचा प्रभावी उपयोग करीत राज्याला विकासाकडे नेले. त्याच धर्तीवर महाराष्ट्राची प्रगती साधण्यासाठी बसपाला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.