शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
2
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
5
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
6
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
7
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
8
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
9
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
10
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
11
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
12
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
13
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
14
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
15
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
16
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
17
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
18
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
19
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
20
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
Daily Top 2Weekly Top 5

वन कर्मचाऱ्यांचा तांत्रिक कामांवर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 22:11 IST

मागील ३० वर्षांपासून वनकर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी आडकाठी आणल्या जात असल्याने त्यांच्या समस्या पूर्ण होईपर्यंत तांत्रिक कामावर बहिष्कार....

ठळक मुद्देविविध समस्या प्रलंबित : वनरक्षक, वनपाल कर्मचाऱ्यांनी घेतला सभेत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील ३० वर्षांपासून वनकर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. त्या सोडविण्यासाठी आडकाठी आणल्या जात असल्याने त्यांच्या समस्या पूर्ण होईपर्यंत तांत्रिक कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय वनरक्षक, वनपाल कर्मचाऱ्यांनी रविवारी पार पडलेल्या सभेत घेतला.महाराष्ट्र राज्य वनरक्षक, वनपाल संघटनेचे अध्यक्ष विजय मेहर, वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेचे केंद्रीय संघटक ललीतकुमार उचिबगले यांच्या मार्गदर्शनात ही सभा पार पडली. या सभेत जिल्ह्यातील शेकडो वनकर्मचारी उपस्थित होते. वनरक्षक, वनपाल ही तांत्रिक कामे यात जीपीएस हाताळणे, उपचार नकाशा काढणे, रोपवन नकाशे काढणे, बेसलाईन तयार करणे, पीडीएवर वनगुन्हे अपलोड करणे, बिनगुन्ह्यांची नोंद पीडीए द्वारे शासनाला सादर करणे, आठ तासाची सेवा असताना २४ तासाची सेवा बजावणे, मोबदल्यामध्ये वनरक्षकांची जुनी वेतनश्रेणी १८०० वरून २४०० रुपयावर करणे तर वनपालाची २४०० वरुन ४२०० करणे आदी मागण्या असताना त्या अपूर्ण आहेत, त्यामुळे मागील ३० वर्षापासून याबाबत शासनासोबत लढा सुरु आहे. याची दखल न घेतल्याने वनकर्मचाºयांनी तांत्रिक कामे करणाºयांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय सभेत घेतला.यावेळी भंडारा वनविभागातील वनरक्षक, वनपाल, संघटनेचे टी.एच. घुले, पप्पू सय्यद, डी.जी. कुशवाह यांच्यासह जिल्ह्यातील वनकर्मचारी उपस्थित होते.या आहेत समस्यावनकर्मचाऱ्यांना मिळणारे टीआरए चुकीने कपात केली जाते, वनपरिक्षेत्र नाकाडोंगरी, भंडारा, जांब कांद्री हे वनकर्मचाऱ्यांना वारंवार त्रास देऊन चुकीची कामे करून घेत असल्याचा आरोप कर्मचाºयांनी लावला आहे. पेट्रोलिंग वाहन वनकर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगला न देता वनपरिक्षेत्राधिकारी स्वत:च्या कामासाठी वापरित असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. चुकीचे बिल तयार करून निधीत अफरातफर केली आहे. वनपरिक्षेत्र जांब कांद्री हे कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याची तक्रार या सभेत करण्यात आली.

टॅग्स :forestजंगल