शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कंत्राटदाराला काळ्या यादीत घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:00 IST

कोट्यवधी रुपयांचे डीपीआर तयार करून तुमसर शहराला सुंदर व स्वच्छ करण्यासाठी शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी हिवरा बाजार येथील संस्थेला नगरपरिषदतर्फे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील शंभर टक्के ओला व सुका कचरा विलगीकृत गोळा करावयाचा आहे.

ठळक मुद्देएनएसयुआयची मागणी : निवेदन, प्रकरण तुमसरच्या घनकचरा व्यवस्थापनाचे

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : नगरपरिषद तुमसर शहरातील विविध प्रभागात दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दैनंदिन स्वच्छतेचे काम होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. स्वच्छतेचे कंत्राट शारदा महिला मंडळ रामटेक यांना देण्यात आले आहे. मात्र गत काही महिन्यापासून तुमसर शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापन हे केवळ दहा टक्के होत असल्याने कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीचे निवेदन एनएसयुआयतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेकोट्यवधी रुपयांचे डीपीआर तयार करून तुमसर शहराला सुंदर व स्वच्छ करण्यासाठी शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापन करण्यासाठी हिवरा बाजार येथील संस्थेला नगरपरिषदतर्फे कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार शहरातील शंभर टक्के ओला व सुका कचरा विलगीकृत गोळा करावयाचा आहे. परंतु कंत्राटदाराकडून कोणतेही काम होत नाही शहरातील घंटागाडीद्वारे दिवसातून दोन वेळा सकाळी सात ते एक व दुपारी तीन ते पाच वाजेपर्यंत कचरा गोळा करणे आवश्वक आहे. परंतु एकच वेळा कचरा गोळा केला जातो तसेच दुपारी एकच्या आधीच घंटागाडी कार्यालयात जमा होतात. घनकचरा व्यवस्थापन केंद्र येथे आवश्यकतेनुसार अंदाजपत्रकाप्रमाणे पाच मजूर सुका कचरा विलगीकृत घनकचरा व्यवस्थापन केंद्रात आवश्यकतेनुसार पाच मजूर सुका कचरा विलगीकृत करण्यासाठी, पाच मजूर खत निर्मिती करण्यासाठी असे एकूण दहा मजूर क्षेपणभूमीवर लावणे आवश्यक आहे. मात्र असे असतानाही कंत्राटदाराने प्रकल्प केंद्रावर फक्त एकच मजूर कार्यरत ठेवला असून इतर मजुरांची व्यवस्था केलेली नाही. घनकचरा व्यवस्थापन केंद्र परिसरात सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याची गरज असून येथे चौकीदार नेमणे गरजेचे आहे. परंतु प्रकल्प केंद्रावर एकही चौकीदार अथवा कोणताही कर्मचारी नसल्याने परिसरातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सदर कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करून काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी एनएसयुआयचे जिल्हाअध्यक्ष पवन वंजारी, तुमसर तालुका अध्यक्ष रोहित बोंबार्डे, केतन साखरगडे, यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.कंत्राटदाराकडून कामगारांची पिळवणूकशहरात कचरा संकलन करणाऱ्या सर्व मजुरांना सुरक्षा साहित्य देणे बंधनकारक आहे. मात्र कंत्राटदाराकडून मजुरांना कोणत्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य आजपर्यत देण्यात आलेले नाही. मजुरांना गणवेश न देता फक्त टी-शर्ट दिले आहेत, मास्क, हॅन्डग्लोज, गमबूट दिलेले नाही.घनकचरा केंद्रावरील दोन महिला कामगार कचºयात मिळालेले फाटलेले हातमोजे वापरतात.

टॅग्स :Socialसामाजिक