शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे जिल्हाभर धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 06:00 IST

भंडारा येथील त्रिमुर्ती चौकात सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाला प्रारंभ झाला. खासदार सुनील मेंढे, भाजप शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, ग्रामीण अध्यक्ष विनोद बांते, जिल्हा परिषद गटनेते अरविंद भालाधरे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत त्रिमुर्ती चौकात भाजपचे पदाधिकारी ठिय्या देवून होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देशासनाचा धोरणाचा निषेध : जिल्हा प्रशासनाला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून महिलांच्या अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करीत भाजपच्यावतीने भंडारा शहरासह सहाही तालुका मुख्यालयी धरणे दिले. भंडारा येथील त्रिमुर्ती चौकात धरणे दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु ती प्रत्यक्षात उतरली नाही. सरसकट कर्जमाफी करण्याची घोषणाही हवेतच विरली. या सरकारने एकही आश्वासन पाळले नाही. उलट कर्जमाफी योजना शेतकऱ्यांची फसवणूक करणारी आहे, असा आरोप प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
भंडारा येथील त्रिमुर्ती चौकात सकाळी ११ वाजता धरणे आंदोलनाला प्रारंभ झाला. खासदार सुनील मेंढे, भाजप शहर अध्यक्ष संजय कुंभलकर, ग्रामीण अध्यक्ष विनोद बांते, जिल्हा परिषद गटनेते अरविंद भालाधरे यांच्या नेतृत्वात धरणे देण्यात आले. दुपारी २ वाजेपर्यंत त्रिमुर्ती चौकात भाजपचे पदाधिकारी ठिय्या देवून होते. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जावून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी राजकूमार गजभिये, चैतन्य उमाळकर, जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरुगकर, पंचायत समिती उपसभापती वर्षा साकुरे, नगर परिषद सभापती आशु गोडाणे, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर, राजेश टिचकुले, मधुरा मदनकर, चंद्रकला भोपे, शमीमा शेख, वनिता कुथे, गीता सिडाम, आशा उके, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष वंदना वंजारी, विनोद भुरे, विष्णु हटवार, शहर युवती प्रमुख प्रिती गोसेवाडे यांच्यासह भाजपचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
भंडारा शहरासोबतच साकोली, तुमसर, मोहाडी, पवनी, लाखांदूर, लाखनी येथेही तालुका भाजपच्या वतीने धरणे देण्यात आले. तहसीलदारांना निवेदन देवून शासनाच्या सरकार विरोधी धोरणाचा निषेध करण्यात आला.

टॅग्स :BJPभाजपा