शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

भीमा कोरेगाव शौर्यदिनी मानवंदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 05:00 IST

१ जानेवारी हा दिवस नववर्षाची सुरुवात, परंतु आंबेडकरवादी जनतेसाठी हा ऐतिहासिक शौर्याचा दिवस आहे. पराक्रमाची प्रेरणा देणारा दिवस होय. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या तिरावर कोरेगाव येथे तत्कालीन अस्पृश्य महारांच्या ५०० सैन्याने पेशव्यांच्या अवाढव्य २८००० सैन्यांचा पराभव केला होता. विजयी ध्वज रोवला होता. या ऐतिहासिक दिनाचे स्मरण करण्यासाठी भंडारा शहरात भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देअभिवादन सभा : समता सैनिक दलाची भंडाऱ्यात रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भीमा कोरेगाव शौर्यदिनानिमित्त येथील त्रिमूर्ती चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर अभिवादन आणि मानवंदना कार्यक्रमाचे बुधवारी आयोजन करण्यात आले होते. भंडारा शहरातून समता सैनिक दलाच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते.
१ जानेवारी हा दिवस नववर्षाची सुरुवात, परंतु आंबेडकरवादी जनतेसाठी हा ऐतिहासिक शौर्याचा दिवस आहे. पराक्रमाची प्रेरणा देणारा दिवस होय. १ जानेवारी १८१८ रोजी पुण्याजवळील भीमा नदीच्या तिरावर कोरेगाव येथे तत्कालीन अस्पृश्य महारांच्या ५०० सैन्याने पेशव्यांच्या अवाढव्य २८००० सैन्यांचा पराभव केला होता. विजयी ध्वज रोवला होता. या ऐतिहासिक दिनाचे स्मरण करण्यासाठी भंडारा शहरात भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे आयोजन करण्यात आले होते.
भंडारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर डॉ.आंबेडकर सार्वजनिक जयंती समारोह समितीतर्फे भीमा कोरेगाव येथील विजयी युद्धात शहीद झालेल्या शूरविरांना मानवंदना देण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष महेंद्र गडकरी, समितीचे अध्यक्ष सचिन बागडे, सल्लागार अमृत बन्सोड, प्रशांत सूर्यवंशी, अजय तांबे, असित बागडे, सुशील नगराळे, दीपक गजभिये, नरेंद्र बन्सोड, पायल गाणार, अमीत उके यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. तत्पूर्वी भंडारा शहरातून समता सैनिक दलाच्या वतीने शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली. रॅलीच्या अग्रभागी भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाची प्रतीकृती होती. या रॅलीने संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

 

टॅग्स :Socialसामाजिक