तीन लाख ७० हजार मतदार ठरवणार भंडाराचा आमदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 06:00 AM2019-09-21T06:00:00+5:302019-09-21T06:00:41+5:30

भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात तीन लाख ७० हजार ६९० मत नोंदणीकृत मतदार आहेत. त्यात एक लाख ८५ हजार २१६ पुरूष तर एक लाख ८५ हजार ४७४ महिला मतदार आहे.

Bhandara MLA to decide 3 lakh 70 thousand voters | तीन लाख ७० हजार मतदार ठरवणार भंडाराचा आमदार

तीन लाख ७० हजार मतदार ठरवणार भंडाराचा आमदार

Next
ठळक मुद्देमहिला मतदार अधिक : एक लाख ८५ हजार १२६ पुरूष तर एक लाख ८५ हजार ४७४ महिला मतदार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वांना निवडणूक तारखांच्या घोषणांची प्रतीक्षा आहे. असे असले तरी जिल्हा प्रशासन मात्र निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. भंडारा या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदार संघातील तीन लाख ७० हजार ६९० मतदार आपला आमदार निवडणार आहे. विशेष म्हणजे पुरूषांपेक्षा महिला मतदाराची संख्या अधिक आहे.
भंडारा जिल्ह्यात तुमसर, भंडारा आणि साकोली या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. भंडारा विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात तीन लाख ७० हजार ६९० मत नोंदणीकृत मतदार आहेत. त्यात एक लाख ८५ हजार २१६ पुरूष तर एक लाख ८५ हजार ४७४ महिला मतदार आहे. पुरूषांपेक्षा महिलांची संख्या अधिक असणारा भंडारा हा मतदारसंघ वैशिष्ट्यपूर्ण आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाने जैय्यत तयारी चालविली आहे. मतदार जनजागृतीच्या माध्यमातून मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भंडारा विधानसभा क्षेत्रात पवनी आणि भंडारा या दोन तालुक्यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात शहरी भागात ८५ आणि ग्रामीण भागात २०४ मतदार केंद्र तर पवनी तालुक्यात शहरी भागात २५ आणि ग्रामीण भागात १४२ असे ४५६ मतदार केंद्र निर्माण करण्यात येणार आहेत. ३०५ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. निवडणूक कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते काम पाहत आहेत. सहायक जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून वंदना सौरंगपते तर भंडाराचे उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ (आयएएस) हे भंडारा विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याच नियंत्रणात निवडणूक प्रक्रिया पार पडली जाणार आहे.
सर्वांना निवडणुकीची उत्सुकता लागली असून आचारसंहितेची अर्थात निवडणूक घोषणेची प्रतीक्षा आहे. राजकीय पक्षासह सर्वसामान्यही निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लक्ष देवून आहेत. अवघ्या एक दोन दिवसात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यानंतर निवडणुकीचे वातावरण तापायला सुरूवात होईल.

पोलीस बहुद्देशीय सभागृहात मतमोजणी
भंडारा विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी पोलीस मुख्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात होणार आहे. तर मतदानानंतर मतदान यंत्र पोलीस मुख्यालयातीलच वैनगंगा सभागृहात सभागृहात सुरक्षित ठेवले जाणार आहे. निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबतच पोलिसांचा चोख बंदोबस्त राहणार आहे.

Web Title: Bhandara MLA to decide 3 lakh 70 thousand voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Votingमतदान