शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
2
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
4
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
5
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
6
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
7
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
8
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
9
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
10
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
11
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
12
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
13
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
14
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
15
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
16
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
17
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
18
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
19
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

लाखनी येथे भजनदिंडी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:04 IST

लाखनी येथे जेएमसी कंपनीमार्फत सार्वजनिक मारोती देवस्थानची गुजरी चौकातील दहा एकर कृषक जागा बळकाविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भजनदिंडी आंदोलन करण्यात आले. मंदिर ते तहसीलकार्यालयापर्यंत ही दिंडी काढण्यात आली होती. दरम्यान तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.

ठळक मुद्देप्रकरण कृषक जागा बळकाविल्याचे : भाविकांनी दिला तीव्र आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : लाखनी येथे जेएमसी कंपनीमार्फत सार्वजनिक मारोती देवस्थानची गुजरी चौकातील दहा एकर कृषक जागा बळकाविल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी भजनदिंडी आंदोलन करण्यात आले. मंदिर ते तहसीलकार्यालयापर्यंत ही दिंडी काढण्यात आली होती. दरम्यान तहसीलदार यांना निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली.जेएमसी कंपनीने मारोती देवस्थान लाखनीच्या जागेवरील बांधकाम तात्काळ थांबविण्यात यावे अशी आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे. तसेच तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालयतर्फे देण्यात आलेल्या सर्व परवानगी पत्र रद्द करण्यात यावे, तहसीलदार व नगर पंचायत मुख्याधिकारी व मधुकर हेडावू यांच्यावर तातडीने कारवाई करुन निलंबित करण्यात यावे, फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. यावर तहसीलदार विराणी यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाला शिफारस करुन परवानगी रद्द करण्यात येतील, अशी माहिती आंदोलनकर्त्यांना दिली. श्रीमारोती देवस्थानचे प्रकरण विश्वस्त विभागाकडे प्रलंबित आहे. सहायक धर्मदाय आयुक्तांची परवानगी नसतांनाही जेएमसी कंपनीला दहा एकर शेतजमीन देण्यात आली असल्याने लाखनीतील नागरिक व भाविकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.यासंबंधाने सदर भजनदिंडी आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आगळ्या वेगळ्या आंदोलनामुळे शहरवासीयांचे लक्ष वेधल्या गेली.