शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

लाभार्थी मारतोय पं.स.च्या चकरा

By admin | Updated: July 16, 2016 00:40 IST

अपंग व अनाथ व्यक्तीचा बिपीएल यादीत नाव समाविष्ट नसल्याने घरकूल योजनेचा लाभ मिळू शकत नाही.

बांधकामानंतरही रक्कम देण्यास टाळाटाळ : अनाथ, अपंग कन्हैया पंधरे यांची व्यथा राहुल भुतांगे तुमसर अपंग व अनाथ व्यक्तीचा बिपीएल यादीत नाव समाविष्ट नसल्याने घरकूल योजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे सन २०१४-१५ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोहयो हमी अंतर्गत त्याला कोठा मंजूर करण्यात आला. कोठ्याचे बांधकाम वर्षाभरापूर्वीच पूर्ण झाले. परंतू अजूनपर्यंत त्याला लाभ राशी देण्यात आली नाही. त्यामुळे त्या लाभार्थ्याला रकमेसाठी पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत आहे. कन्हैया बैसाखू पंधरे (४०) रा. पवनारखारी ता. तुमसर असे त्या अनाथ व अपंग इसमाचे नाव आहे. घरात आधीच अठराविश्व दारिद्र. त्यात कन्हैयाच्या अपंगत्वाने भर टाकली. आदिवासी समाजाचे असल्याने कन्हैया यांचे वडील भूमिहिन होते. कशीबशी मोलमजुरी करुन कुटूंबाचा ते उदरनिर्वाह करित आहेत. दरम्यान कन्हैयाची आई व वडील वारल्याने कन्हैया एकाकी अनाथ झाला. आधीच तो बोलू शकत नव्हता. त्यामुळे कन्हैयावर उपासमारीचे संकट ओढावले. पोटाची खडगी भरणेही आवश्यक असल्यामुळे गावात एका ठिकाणी न राहता इतरत्र फिरुन कुठे मोलमजुरी करुन तर कुठे भिक्षा मागुन पोटाची खडगी भरत राहणे हा कन्हैयाचा नित्यक्रम. त्याचे राहते घर पुर्णत: जमिनदोस्त झाले. दरम्यान गावांगावात बीपीएल सर्वे घेण्यात आले. परंतु त्यावेळी कन्हैया गावात हजर नव्हता. त्यामुळे कदाचित त्याचे नाव बीपीएल यादीत समाविष्ठ झाले नसावे, सध्या कन्हैया पवनारखारी येथे वास्तव्यास आहे. परंतु राहण्याकरिता व डोके लपविण्याकरिता त्याच्याकडे छतही नाही. त्यामुळे कन्हैयाला एखादा घराच्या पडवीतच रात्र काढावी लागत होती. त्याचे दुख गावातील उपसरपंच विलास उचिबगले यांना राहावले नाही. कन्हैयाकरिता काहीतरी करता येतो का? याचाच शोध घेत असताना मग्रारोहयो अंतर्गत कोठा बांधकामाची योजना अमलात आली. पहिल्याच खेपेला कन्हैया पंधरेला लाभ मिळवून दिला. पंरतु कन्हैयाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खुद्द विलास उचिबगले यांनी स्वत: पैसे खर्च करुन कन्हैयासाठी कोठ्याचे बांधकाम करुन देवून त्याला राहण्यापुरतीचा आश्रय मिळवून दिला. मात्र कोठा बांधकामाची देयक काढण्यास मग्रारोहयोचे तांत्रिक पॅनल अधिकारी राजु लांजेवार हे टाळाटाळ करीत आहेत. लाभार्थीकडून आर्थिक देवाण घेवाणची अपेक्षा बाळगळल्याने लाभार्थ्याला पंचायत समितीच्या चकरा माराव्या लागत आहे. ही बाब समोर येताच तत्कालीन सभापती यांनी खंडविकास अधिकाऱ्यासमोर व्यथा मांडली. पंरतु खंडविकास अधिकाऱ्यांना केव्हा पाझर फुटेल, हे सांगणे जरा कठीणच आहे.