शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

‘निष्ठी’ रेशीम गाव म्हणून नावलौकिक व्हावा

By admin | Updated: March 4, 2016 00:38 IST

टसर रेशीम उत्पादनात जिल्ह्याला १५० वषार्पासून पारंपारिक वैभवशाली परांपरा लाभलेली आहे.

भंडारा : टसर रेशीम उत्पादनात जिल्ह्याला १५० वषार्पासून पारंपारिक वैभवशाली परांपरा लाभलेली आहे. तसेच जिल्ह्यातील निष्ठी, सितेपार, जमनी, किटाळी असे रेशीम केंद्र आहेत. त्यातील रेशीम महाराष्ट्रात विक्रीसाठी आघाडीवर आहे. ही बाब प्रशंसनीय आहे. निष्ठीस रेशीम गाव म्हणून लौकिक मिळावा. यासाठी येथील लाभार्थ्यांनी रेशिम उत्पादनात वाढ करावी. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होवून त्यांचे जीवनस्तर उंचावण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी येथे केले. संयुक्त वन व्यवस्थापन समिती, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व रेशीम कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पवनी तालुक्यातील टसर रेशीम धागा निर्मिती केंद्र निष्ठी येथे टसर रेशीम धागा निर्मिती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी टसर रेशीम लाभार्थ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पवनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पवनीत कौर, उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीन, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, माविमच्या ज्योती निंभोरकर, रेशीम विकास अधिकारी एस. के. शर्मा उपस्थित होते. अनुपकुमार म्हणाले, वन विभागातर्फे लाभार्थ्यांसाठी ५० टक्के वन लागवडीसाठी उपलब्ध आहे. त्याचा लाभार्थ्यांनी फायदा घेवून गावात कोष उत्पादन करावे. तसेच उत्पादनाची टक्केवारी वाढवावी. कोष निर्मिती, रिलींग व कापड निर्मिती गावातच झाली तर निश्चितच त्याचा फायदा लाभार्थ्यांना होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. यासाठी लागणारे सर्व सोयी उपलब्ध करण्यात येतील, असेही आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले. केंद्रास रेशिम धागा निर्मितीसाठी लाभार्थ्यांच्या मागणीप्रमाणे ४० रिलींग मशिन उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही ते म्हणाले. गावातच कोषापासून सर्व प्रक्रिया करुन साडी निर्मिती केल्यास निश्चितच उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न वाढीस मदत होईल असे त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी अनुपकुमार म्हणाले, जिल्ह्यात ५० लाख कोष उत्पादन व्हायला पाहिजे, त्यासाठी लाभार्थ्यांनी प्रयत्नशिल रहायला पाहिजे. दिवसेंदिवस वन नष्ट होत आहेत. त्यांची संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रेशीम लागवडीत वाढ झाली पाहिजे व जिल्ह्याचे नाव लौकिक रेशिम जिल्हा म्हणून कसे होईल, यावर भर दिला पाहिजे. लाभार्थ्यांनी रेशिम विक्रीसाठी सक्षम बनले पाहिजे तसेच योग्य भाव कसे मिळेल याविषयी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. यावेळी अनुपकुमार यांनी टसर निर्मिती केंद्रास भेट देवून तेथील रेशीम धागा निर्मिती प्रक्रियेविषयी महिला कामगारांकडून माहिती घेतली. रेशिम उत्पादन वाढीसाठी प्रत्येक गावात रेशीमदूतांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. या वर्षात १५ लाख अंडीपूंजाची निमीर्ती करण्यात आली. परंतु त्या बाजारपेठसाठी सुविधा नसल्याने अत्यल्प भाव मिळत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)