धीर धरा, बोनस हमखास मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:44 IST2021-06-09T04:44:06+5:302021-06-09T04:44:06+5:30

आम्ही शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची मागणी केली. त्याअंतर्गत गत दोन वर्षांत भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ ...

Be patient, you will definitely get a bonus | धीर धरा, बोनस हमखास मिळेल

धीर धरा, बोनस हमखास मिळेल

आम्ही शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची मागणी केली. त्याअंतर्गत गत दोन वर्षांत भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २ हजार ५६८ रुपये प्रती क्विंटल धानाला भाव दिला जात आहे. गतवर्षीपासून देशात व राज्यात कोरोना संकटाने सरकारची वित्तीय स्थिती बिघडल्याने बोनस मिळण्यात विलंब झाला आहे. मात्र, बोनस हमखास मिळणार असे सांगितले. जिल्ह्यात कोरोना रुग्णांना ऑक्सिजन बेड, रेमडेसिविर इंजेक्शन, फॅबीफ्ल्यू गोळ्यांसह सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठक घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचे सांगितले. सर्व नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, ॲड. जयंत वैरागडे, गटविकास अधिकारी जी. पी. अगर्ते, माजी अध्यक्ष नरेश दिवठे, बाजार समिती उपसभापती देविदास राऊत, तालुकाध्यक्ष बालू चुन्ने, देवानंद नागदेवे, कल्पना जाधव, शंकर खराबे, गीता लंजे, वैशाली हटवार, ॲड. नेहा शेंडे, जिक्रीया पठाण, सुनिता बिसेन, देवा राऊत, मिलिंद डोंगरे, मंगेश ब्राम्हणकर, सुद्बोधन टेंभुर्णे, सूरज मेंढे, सुभाष दिवठे, नरेश सोनटक्के, रेशिम परशुरामकर, डॉ. विजय फुंडे, दीपक चिमणकर, संतोष गोंधळे, वसंता तऱ्हेकार, रजनीकांत खंंडारे, हितेश झोडे, धनराज वासनिक, रेवराम देसाई, संजय नहाले, कृष्णा शेंडे, सचिन बरये, अमित जगझापे, पंकज गायकवाड, रोशन बनकर, राहुल फुंडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक शहरअध्यक्ष ॲड. मोहन राऊत यांनी केले. संचालन राकेश राऊत यांनी मानले.

===Photopath===

070621\img20210606142628.jpg

===Caption===

खा पटेल यांचे स्वगत करतांना तालुका अध्यक्ष बालु चुन्ने तथा शहर अध्यक्ष ॲड मोहन राऊत

Web Title: Be patient, you will definitely get a bonus