शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! आता बनावट पासधारकांना कोठडी!

By admin | Updated: March 27, 2015 00:18 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना अनेकजण बनावट ओळखपत्र,

लोकमत विशेषप्रशांत देसाई भंडारामहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना अनेकजण बनावट ओळखपत्र, प्रमाणपत्र व पासचा वापर करतात. अशा प्रवाशांची आता राज्य परिवहन महामंडळाकडून गय केली जाणार नाही. बनावट कागदपत्रांचा आधार घेणाऱ्या प्रवाशांवर शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेऊन पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय रापमंने घेतला आहे. वेळप्रसंगी अशा आरोपींना कोठडीची हवा खावी लागणार आहे.नागरिकांना एका गावाहून दुसऱ्या गावाला प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मागील ७५ वर्षांपासून अविरत सेवा सुरू केली आहे. दरम्यान, रापमंच्या बसेसला पर्यायी व्यवस्था म्हणून अनेकांनी खासगी ट्रॅव्हल्स सुरू केल्या आहेत. ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांच्या सेवेत सदैव तत्पर असलेल्या बसच्या प्रवासाला आजही नागरिकांची पहिली पसंती आहे. परिवहन महामंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकरिता महामंडळाने अनेक महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी केली आहे. अनेक चांगल्या योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असतानाच बनावट ओळखपत्र, प्रमाणपत्र व पासचा वापर करून प्रवास करणाऱ्यांची संख्या आता दिवसागणिक वाढत चालली आहे. यामुळे रापमंच्या आर्थिक उत्पन्नावर विपरीत परिणाम पडत आहे. अशा प्रवाशांवर अंकुश ठेवता यावे, यासाठी रापमंने हा निर्णय घेतला असून तसे आदेश निर्गमित केले आहे. या आदेशानुसार, शासनाच्या सर्व सवलतींचा गैरफायदा घेऊन बसमधून प्रवास करताना कुणी आढळल्यास त्याच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेऊन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बनावट कागदपत्रांचा वापर करून राज्य मार्ग परिवहन महामंडळ व शासनाची फसवणूक करणाऱ्या प्रवाशांची गय केली जाणार नसल्याने, अशा प्रवाशांनी आता वेळीच दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांना वेळप्रसंगी पोलीस कोठडीची हवा खावी लागणार आहे.