शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! कोरोना डबलिंग दर वाढतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

पठाणपुरा वार्डातील बाधित व्यक्तीला २२ ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती करण्यात आले होते. या व्यक्तीला न्यूमोनिया झाला होता. आज सकाळी ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. २४ तासातील बाधितांमध्ये ३७ बाधित चंद्र्रपूर शहर व परिसरातील आहेत. बल्लारपूर १९, चिमूर २, वरोरा ५, मूल ६, कोरपना ५, पोंभुर्णा एक व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून आलेला एक असे एकूण ७६ जण आहे.

ठळक मुद्दे७६ रूग्ण आढळले : एकाचा मृत्यू, जिल्ह्यात १५७१ बाधित

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : शहरातील पठाणपुरा वार्डातील ७२ वर्षीय बाधित व्यक्तीचा मंगळवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे मृतकांची संख्या १८ झाली आहे. आज जिल्ह्यात एकाच दिवशी ७६ पॉझिटिव्ह आढळले. रूग्णांची संख्या १५७१ झाली. उपचारानंतर १०३७ व्यक्ती कोरोनामुक्त झाले. कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट पूर्वी १२-१३ वर गेला होता, नंतर तो २४ पर्यंत आला होता. आता २० वर आला आहे. याचा अर्थ २० दिवसात रुग्ण दुप्पटीने वाढत आहे.
पठाणपुरा वार्डातील बाधित व्यक्तीला २२ ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भरती करण्यात आले होते. या व्यक्तीला न्यूमोनिया झाला होता. आज सकाळी ८ वाजता त्यांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात १८ बाधितांचा मृत्यू झाला आहे. २४ तासातील बाधितांमध्ये ३७ बाधित चंद्र्रपूर शहर व परिसरातील आहेत. बल्लारपूर १९, चिमूर २, वरोरा ५, मूल ६, कोरपना ५, पोंभुर्णा एक व यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथून आलेला एक असे एकूण ७६ जण आहे. तुकूम, पंचशील चौक, नगीनाबाग, दानववाडी, मित्र नगर, बाबूपेठ, जलनगर, उत्तम नगर, समाधी वार्ड, रयतवारी कॉलनी, जेबी नगर, गांधी चौक, अंचलेश्वर वार्ड, चोर खिडकी वार्डात आज रुग्ण आढळले.

५० वर्षांवरील सर्वांचीच तपासणी - जिल्हाधिकारी
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाने मृत्यू झालेले सर्व व्यक्ती ५० वर्षे वयोगटातील आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर व सर्व नगर परिषद क्षेत्रातील ५० वर्षांवरील सर्वांची आरोग्य पथकाद्वारे घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पल्स आॅक्सिमीटर, थर्मल स्क्रीनिंगद्वारे तपासणी व नोंद केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिली. जिल्ह्यातील १५७१ बाधितांपैकी ० ते ५ वर्षे वयोगटातील ३२ बाधित, ६ ते १८ वर्षे वयोगटातील १२८ बाधित, १९ ते ४० वर्षे वयोगटातील ८८० बाधित, ४१ ते ६० वर्षे वयोगटातील ४०७ बाधित, ६१ वर्षांवरील ९४ बाधित आहेत. १५७१ बाधितांपैकी १०५५ पुरूष व ५१६ बाधित महिला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या