शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाच्या पायाभूतचा ‘पायाच’ डगमगला

By admin | Updated: October 8, 2015 00:21 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने बालभारतीच्या माध्यमातून ‘पायाभूत चाचणी’ घेण्याचे आदेश दिले.

लोकमत विशेषप्रशांत देसाई भंडाराविद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने बालभारतीच्या माध्यमातून ‘पायाभूत चाचणी’ घेण्याचे आदेश दिले. मात्र, सप्टेंबर महिना लोटूनही जिल्ह्यातील या पायाभूत चाचण्या पूर्ण झालेल्या नाहीत. दुसरीकडे जिल्ह्यात शिक्षकांची रिक्त पदे, सरलच्या कामात शिक्षक, निवडणुकांचे बीएलओ, शालार्थ अशा अनेक कामांत शिक्षकांना लावल्याने जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगती थंडावली आहे. शिक्षण विभागाने पायाभूतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधण्याचा प्रयत्न केला असला तरी, सध्या त्यांचा पायाच डगमगल्याने ‘शिक्षणाच्या आयचा घो’ म्हणण्याचा प्रसंग पालकांवर ओढवला आहे.शालेय विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्रगत महाराष्ट्र शैक्षणिक उपक्रमाच्या माध्यमातून नाविण्य उपक्रम सुरू करण्यात आले. बालभारतीच्या सहकार्यातून राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती साधता यावी, यावर भर दिला आहे. त्याअनुषंगाने, यावर्षीपासून शिक्षण विभागाने मागीलवर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित पायाभूत चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल तयार करण्याचे ठरविले. ही चाचणी वर्षातून तीनवेळा घ्यायची आहे. पहिल्याच चाचणीला आॅक्टोबर महिना सुरु झाला असतानाही आणखी दोन चाचण्या केव्हा घेणार, असा प्रश्न शिक्षकांसमोर आहे. महिनाभरावर दिवाळी आली असून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांची प्रथम सत्र परीक्षाही दिवाळीपूर्वी होणे आवश्यक आहे. अशातच शिक्षण विभागाच्या सरल, शालार्थ प्रणालीच्या कामात शिक्षक शाळेत न राहता, माहिती अद्ययावत करण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे. अगोदरच जिल्ह्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यातल्या त्यात, जिल्ह्यात होऊ घातलेल्या नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी शिक्षकांना बीएलओची कामे सोपविण्यात येणार आहे. आरटीई कायद्याचा घोळ या बाबींमुळे शिक्षक शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर चालला आहे. परिणामी त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.