शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

मोतीबिंदू शस्त्रक्रियेत भंडारा राज्यात अव्वल

By admin | Updated: November 20, 2014 22:46 IST

राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातुन भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात सात महिन्यात दोन हजार सहा रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. उद्दीष्टपूर्तीकडे जाताना

उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल : सात महिन्यांत दोन हजारांवर शस्त्रक्रियाप्रशांत देसाई - भंडारा राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातुन भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयात सात महिन्यात दोन हजार सहा रूग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे. उद्दीष्टपूर्तीकडे जाताना भंडारा जिल्हा राज्यात प्रथम स्थानावर आहे. शासनाने दिलेले उद्दीष्ट सात महिन्यातच पूर्णत्वाकडे पोहोचला आहे.राज्य शासनाच्यावतीने रूग्णांसाठी विविध योजना अंमलात आणल्या आहेत. रूग्णांवर मोफत औषधोपचार करण्यासाठी आरोग्य सेवा कार्यरत आहेत. राज्यातील सर्व जिल्हा सामान्य रूग्णालयांना एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ या वर्षासाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेचे उद्दीष्ट देण्यात आले होते. त्यात भंडारा जिल्ह्याला २ हजार २५० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट होते. भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयाने उद्दीष्टपूर्तीच्या दिशेने वाटचाल सुरू केली.भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालय व तुमसर उपजिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातून एप्रिल ते आॅक्टोबर या सात महिन्यात जिल्ह्याने २ हजार ६ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली आहे. राज्यात बीड दुसऱ्या तर उस्मानाबाद जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. भंडारा जिल्ह्यात दोन्ही डोळ्यांवर १ हजार १९४ व्यक्तींवर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात १ हजार १७३ महिला असून १ हजार ४१७ अनुसूचित जाती प्रवर्गातील व्यक्तींचा समावेश आहे. १३ नेत्र चिकित्सकांनी या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. यातील १ हजार १६४ मोतीबिंदू शस्त्रक्रिया सामान्य रूग्णालयातील मुख्य नेत्ररोग चिकित्सक डॉ.एल. के. फेगडकर यांनी केलेल्या आहेत.