भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका, पावसासह गारपिटीचाही तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 07:05 PM2023-04-22T19:05:59+5:302023-04-22T19:07:37+5:30

भंडारासह तुमसर, लाखनी, मोहाडी, पालांदूर, अड्याळ, पवनी व साकोली येथे पावसाने चांगलीच हजेरी लावली.

Bad weather hits Bhandara district again, | भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका, पावसासह गारपिटीचाही तडाखा

भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका, पावसासह गारपिटीचाही तडाखा

googlenewsNext

इंद्रपाल कटकवा

भंडारा : जिल्ह्यात महिन्याभरात चौथ्यांदा पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसासह गारपिटीचाही तडाखा बसला. जिल्ह्यातील भंडारासह तुमसर, लाखनी, मोहाडी, पालांदूर, अड्याळ, पवनी व साकोली येथे पावसाने चांगलीच हजेरी लावली.

ग्रामीण क्षेत्रात आठवडी बाजार असल्याने या पावसाचा प्रभाव जाणवला. आलेल्या वादळामुळे अनेक कच्च्या घरावरील टीन व कवेलू उडाले. मोहाडी येथे झाड उन्मूळून घरावर कोसळले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. या पावसाचा मात्र भाजीपाला पिकांवर विपरीत परिणाम जाणवेल हे नक्की.

Web Title: Bad weather hits Bhandara district again,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.