शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभाग उद्दिष्टांपासून दूर

By admin | Updated: September 18, 2014 23:30 IST

तालुका व गावात आरोग्य विभागाची तगडी यंत्रणा असतानाही आरोग्य विभागाचे अधिकारी आपल्या कर्तव्यापासून दूर असल्याचे निदर्शनास येते.

मोहाडी : तालुका व गावात आरोग्य विभागाची तगडी यंत्रणा असतानाही आरोग्य विभागाचे अधिकारी आपल्या कर्तव्यापासून दूर असल्याचे निदर्शनास येते.आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना गाव पातळीवर काम करावे लागते. या विभागातील कर्मचाऱ्यांना वार्षिक लक्ष दिले जाते. वार्षिक लक्षाच्या दिशेने त्यांना कर्तव्य बजावून साध्य साधण्यासाठी वेगळी वेळ द्यावी लागते. आज आरोग्य विभागाकडे गावपातळीवर कार्य करण्यासाठी वेगळी वेळ नाही तसेच बऱ्याच ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारती तयार करण्यात आल्या आहेत. या इमारतीत आरोग्य विभागाचे कर्मचारी राहत नाही. कर्तव्यस्थान सोडून आरोग्य विभागाचे कर्मचारी शहरातून ये जा करतात. त्यामुळे त्यांचा दिलेल्या कामावर दुर्लक्ष होत चालले आहे. हे आरोग्य विभागाच्या आढाव्यावरून स्पष्ट दिसून येते. शस्त्रक्रियासाठी आरोग्य विभागाला ८०३ चे वार्षिक लक्ष दिले होते. पण आजपर्यंत ११४ वार्षिक लक्ष साध्य झाले. ४८० तांबी बसवायच्या होत्या. यापैकी केवळ ७९ तांबी बसविण्यात आल्या आहेत. २ मात्रा तिहेरी लसचे लक्ष २२९३ आहे. फक्त ७१४ साध्यापर्यंत आरोग्य विभाग पोहचला आहे. पोलीओ लस ३ मात्रा २२९३ यापैकी ७१४ लक्ष साध्य झाले. बीसीजी लस २२९३ वार्षिक लक्ष यापैकी ३७७ च्या आकड्यात लक्ष पोहचले आहे. गोवर लसाचे २२९३ वार्षिक लक्ष देण्यात आले. त्यापैकी ७१७ लक्ष साध्य झाले. तिहेरी लस पुरक मात्रेचे २३६८ वार्षिक लक्ष दिले गेले आहे. त्यापैकी आतापर्यंत ८३८ लक्षापर्यंत काम झाले आहे. पोलिओ लस पुरक कामाचे वार्षिक लक्ष तेवढेच होते आणि साध्यही तेवढ्यावर गेले आहे. गरोदर मातांची नोंदणीचे वार्षिक लक्ष २५२३ आहे. त्यापैकी आजपर्यंत ९२७ गरोदर मातांची नोंदणी करण्यात आली आहे. धनुर्वात प्रतिबंधक लस मातांना द्यायची आहे. त्याचे वार्षिक लक्ष २५२३ आहे. त्यापैकी ८८५ लक्ष आतापर्यंत साध्य झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)