शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षात विद्यार्थ्यांचा व्यसनमुक्तीचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

अलीकडे लहान बालकांपासून ते वृद्धापर्यंत  सिगारेट ओढण्याचे व दारू, तंबाखू सेवनाचे प्रकार झपाट्याने वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम दिसत असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून माणसाच्या जगण्याशी, संस्कृतीशी जुळलेल्या तंबाखूला प्रतिबंध करणे शक्य झालेले नाही. तोच धागा पकडून मोहगावदेवी येथील महात्मा जोतिबा फुले शाळेतर्फे जागतिक धूम्रपान विरोधी दिनानिमित्त जनजागरण करण्यात आले.  

ठळक मुद्देमोहगावदेवीची शाळा : विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे काैतुक, उपक्रमाची तालुक्यात चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी  :  नव्या वर्षाच्या स्वागताची धामधूम सुरू आहे. नूतन वर्षाला  तरुणाईमध्ये थर्टी फर्स्टचा उत्साह दिसून आला.  मात्र मोहाडी तालुक्यातील मोहगावदेवी येथील महात्मा जोतिबा फुले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी थर्टी फर्स्टच्या दिवशी व्यसनमुक्तीचा अनोखा, कौतुकास्पद उपक्रम राबवत आगामी वर्ष आनंददायी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण जागर केला. या उपक्रमाची तालुक्यात चर्चा होत होती.अलीकडे लहान बालकांपासून ते वृद्धापर्यंत  सिगारेट ओढण्याचे व दारू, तंबाखू सेवनाचे प्रकार झपाट्याने वाढत आहे. त्याचे दुष्परिणाम दिसत असतानाही गेल्या कित्येक वर्षांपासून माणसाच्या जगण्याशी, संस्कृतीशी जुळलेल्या तंबाखूला प्रतिबंध करणे शक्य झालेले नाही. तोच धागा पकडून मोहगावदेवी येथील महात्मा जोतिबा फुले शाळेतर्फे जागतिक धूम्रपान विरोधी दिनानिमित्त जनजागरण करण्यात आले.  मुख्याध्यापक राजकुमार बांते यांच्या संकल्पनेतून  हंसराज भडके, हेमराज राऊत, गजानन वैद्य, गोपाल मडामे, शोभा कोचे,  लीलाधर लेंडे, मोहन वाघमारे, श्रीहरी पडोळे यांच्या सहकार्याने उपक्रम साकार करण्यात आला.शाळेच्या समोरील भंडारा - तुमसर राज्य मार्गाच्या कडेने उभे राहून धूम्रपान करण्याचे दुष्परिणाम करणारे फलक विद्यार्थ्यांनी  हातात घेऊन जागर केले. तसेच कोरोनाचे संकट अजून संपले नाही. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मास्क लावा - सामाजिक अंतर ठेवा - वारंवार हात धुवा- स्वच्छता राखा असे संदेश देणारे फलकही विद्यार्थ्यांच्या हाती दिसून आले. तसेच नवीन वर्षाच्या शुभेच्छासुद्धा फलकाद्वारे  गावकऱ्यांना व राज्य मार्गावरून येणाऱ्या - जाणाऱ्यांना दिल्या जात होते. मुलांनी अर्धा  किलोमीटर लांब रांग लावून  साखळी बनविली होती. मार्गक्रमण करणाऱ्यांच्या नजरा त्या फलकांकडे वळत होत्या. काहीजण एक क्षण थांबून फलक वाचताना दिसत होते. या उपक्रमाची चर्चा तालुक्यात होत असून शाळेचे कौतुक केले जात आहे. या जागर कार्यक्रमात नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग केला होता. मुख्याध्यापक राजकुमार बांते म्हणाले, शाळेतील विद्यार्थी संदेश वाहक आहेत. त्यांच्या माध्यमातून तरुण व्यसनापासून परावृत्त व्हावेत, असा छोटासा  समाजकार्याचा व जागराचा प्रयत्न शाळेच्या वतीने  करण्यात आल्याचे सांगितले.

टॅग्स :Teacherशिक्षकStudentविद्यार्थी