शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा; एआयएडीएमकेमध्ये फूट
2
Top Marathi News Live: 'नीट' पेपरफुटीच्या मुद्द्यावरून ABVPचे दिल्लीच्या NTE कार्यालयाबाहेर आंदोलन
3
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
4
तमिळनाडू सरकारचा २४ तासात मोठा 'यू-टर्न'; ज्योतिषी रिकी पंडित यांची 'OSD' पदावरून उचलबांगडी
5
Mumbai: डोक्यावर हात ठेवून आजार बरे करणाऱ्या चौघांना बेड्या; घरात देवाच्या मूर्ती, प्रतिमा पूजेला विरोध केल्याचा आरोप
6
"ओ शंभूराजेsss...", 'राजा शिवाजी'नंतर असं बदललं अभिषेक बच्चनचं आयुष्य, सांगितला किस्सा
7
Loan Rates Hike: 'या' सरकारी बँकेनं वाढवले व्याजदर, आता Home Loan आणि Car Loan चे EMI होऊ शकतात महाग
8
पॅट कमिन्सला BCCIचा मोठा दणका! हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यरसह 'नकोशा' यादीत मिळालं स्थान
9
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल 'भाजपा'मधून लढणार; रोहित पवारांचा मोठा दावा
10
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
11
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
12
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
13
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
14
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
15
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
16
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
17
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
18
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
19
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
20
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

तालुक्यातील जमिनीची पोत धानाच्या उत्पादनासाठी पोषक असल्याने तालुक्यात सर्वत्र धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीपुरक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्याने कर्जबाजारी होऊन शेती करावी लागत आहे. धानाच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचे सर्वस्व अवलंबून आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धानाला घोषीत झालेला बोनस पाहूनच शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केली.

ठळक मुद्देहाती पैसा नसल्याने चिंतेत : अर्जुनी-मोरगाव तालुका वगळला

लोकमत न्यूज नेटवर्क
बोंडगावदेवी : मागील वर्षाच्या खरीप हंगामातील धानाच्या बोनसची अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील समस्त शेतकरी चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत आहेत. जिह्यातील इतर तालुक्यांत बोनसचे वाटप करण्यात आल्याची माहिती असताना अर्जुनी-मोरगाव तालुक्यालाच बोनस वाटपाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशात लोकप्रतिनिधी गप्प असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
तालुक्यातील जमिनीची पोत धानाच्या उत्पादनासाठी पोषक असल्याने तालुक्यात सर्वत्र धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस शेतीपुरक वस्तुंच्या किंमती गगनाला भिडल्याने कर्जबाजारी होऊन शेती करावी लागत आहे. धानाच्या उत्पादनावरच शेतकऱ्यांचे सर्वस्व अवलंबून आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी धानाला घोषीत झालेला बोनस पाहूनच शासकीय धान खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धानाची विक्री केली. बोनस मिळणार यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. बोनसच्या मिळणाऱ्या राशीने आजच्या खरीप हंगामात पैशांची अडचण भासणार नाही अशी अपेक्षा होती. परंतु आजघडीला शेतकºयांच्या खात्यामध्ये बोनस जमा झाला नाही हे वास्तव चित्र आहे. बोनस कधी मिळणार असा टाहो शेतकरी वर्गातून फोडला जात आहे.
विशेष म्हणजे, शासकीय धान खरेदी केंद्रावरुन खरेदी करण्यात आलेल्या धान व शेतकऱ्यांची माहिती दरदिवशी जिल्हा मार्केटींग कार्यालयात जाते. असे असताना बोनस वाटप करताना तालुका निहाय निकष का? ठेवण्यात आला असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी विचारीत आहे. केंद्रावर दर दिवशी जशी खरेदी होते त्याचप्रमाणे बोनसचे वाटप जर झाले असते तर संपूर्ण तालुका बोनस पासून वंचीत राहिला नसता. शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणवून घेणारे लोकप्रतिनिधी यावर मुग गिळून का आहेत असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेला आदिवासी, नक्षलग्रस्त तालुका विकासाचा निधी मिळण्यात मागे राहत आली. तरिही बोनस वाटपाच्या प्रक्रियेत अर्जुनी-मोरगाव तालुक्यावर अन्याय होत असताना जबाबदार लोकप्रतिनिधी गेले कुठे असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी