शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पुरस्कार योजनेत घोळ करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:23 IST

भंडारा: केंद्र शासनाच्या असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेच्या निवड प्रक्रियेत घोळ केला जात असल्याने या संपूर्ण ...

भंडारा: केंद्र शासनाच्या असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार योजनेच्या निवड प्रक्रियेत घोळ केला जात असल्याने या संपूर्ण प्रक्रियेची योग्य ती चौकशी करून प्रामाणिकपणे पुरस्कार प्रक्रिया व्हावी यासाठी राज्याला निर्देश द्यावे, अशा आशयाचे पत्र खा.सुनील मेंढे यांनी केंद्रीय पंचायत राजमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

भंडारा जिल्ह्यातील मोहदुरा येथील ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर लिचडे यांनी खा. सुनील मेंढे यांच्याकडे दिलेल्या तक्रारीच्या आधारे हे पत्र केंद्रीय मंत्र्यांना लिहिण्यात आले आहे. केंद्र पुरस्कृत पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार तपासणीसाठी म्हणजे मानांकनासाठी राज्य शासनाचा एक चमू नांदेड येथून गावात आला होता. तपासणी झाल्यानंतर चमूकडून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर गुण नोंदविणे गरजेचे असते परंतु गुण नोंदविण्याआधीच संकेतस्थळावर ग्रामपंचायतीच्यापुढे गुण नोंदविले असल्याचे दिसून आले. पुरस्कार योजनेत योग्य ग्रामपंचायतीला वगळून मर्जीतील ग्रामपंचायतीला पुरस्कृत करण्याचा राज्य शासनाचा डाव असल्याचे तक्रारीत सरपंच लिचडे यांनी म्हटले होते.

दरम्यान या तक्रारीच्या आधारे खा. मेंढे यांनी केंद्रीय मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात या सर्व प्रकारची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तपासणी होण्यापूर्वीच संकेतस्थळावर ग्रामपंचायत मोहदुराच्या पुढे गुण कसे भरण्यात आले? हा गंभीर विषय असून त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या चमूला त्यात बदल करता आला नाही, असेही खा. मेंढे यांनी म्हटले आहे. हा प्रकार राष्ट्रीय स्तराच्या प्रकारात घोळ घालण्याचे संकेत देणारा आहे. राज्य शासन अपात्र पंचायतींना पुरस्कार देण्यासाठी आग्रही असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. राज्य शासनाकडून होत असलेल्या या घाणेरड्या राजकारणाची स्वतः हस्तक्षेप करून चौकशी व्हावी व पुन्हा तपासणी होऊन योग्य ग्रामपंचायतींना पुरस्कृत केले जाईल यासाठी निर्देश द्यावेत अशी मागणी या पत्रातून खा. सुनील मेंढे यांनी केली आहे.