शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भ कोकण ग्रामीण बँकेत दरोड्याचा प्रयत्न फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 23:50 IST

सूत्रानुसार, दोन अज्ञात दरोडेखोरांनी बँकेत दरोडा टाकण्याच्या हेतूने खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला.  दरोडेखोरांनी शाखा व्यवस्थापकाच्या कक्षातून प्रवेश केल्याने लगेच सायरन वाजले. सायरनच्या आवाजाने  घाबरून संबंधितांनी बँकेतील संगणक मॉडेम निकामी केले. मॉडेम निकामी करून बँकेतील  तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने तब्बल अडीच तासांनंतर पहाटे २.४६ वाजता दोन्ही दरोडेखोर  घटनास्थळावरून पसार झाले.

ठळक मुद्देपरसोडी येथील घटना : दोन जणांविरूद्ध पोलिसांत गुन्हा, तपास सुरूच

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दरोड्याच्या हेतूने शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञातांनी परसोडी (नाग) येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक इमारतीतील लोखंडी खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला. मात्र, सायरनच्या आवाजाने घाबरून तब्बल अडीच तासांनंतर केवळ संगणक मॉडेम चोरून नेल्याची घटना घडली.  सूत्रानुसार, दोन अज्ञात दरोडेखोरांनी बँकेत दरोडा टाकण्याच्या हेतूने खिडकी तोडून बँकेत प्रवेश केला.  दरोडेखोरांनी शाखा व्यवस्थापकाच्या कक्षातून प्रवेश केल्याने लगेच सायरन वाजले. सायरनच्या आवाजाने  घाबरून संबंधितांनी बँकेतील संगणक मॉडेम निकामी केले. मॉडेम निकामी करून बँकेतील  तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. तिजोरी फोडण्यात अपयश आल्याने तब्बल अडीच तासांनंतर पहाटे २.४६ वाजता दोन्ही दरोडेखोर  घटनास्थळावरून पसार झाले. हा सबंध प्रकार बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सदर दरोडा दोन अज्ञात चोरट्यांनी टाकल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेची माहिती सकाळी येथील नागरिकांसह बँक कर्मचाऱ्यांना होताच लाखांदूर पोलिसांना माहिती देण्यात आली.लाखांदूरचे  पोलीस निरीक्षक मनोहर कोरेटी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहान्दे, पुंडलिक मस्के, पोलीस अंमलदार राहुल गायधने, संदीप बावनकुळे,  भुपेश बावनकुळे आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह शाखा व्यवस्थापक व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनेची पाहणी व पंचनामा केला.  अज्ञात दरोडेखोरांनी केवळ संगणक मॉडेम चोरल्याचे आढळून आल्याने अज्ञातांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तपास येथील ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

टॅग्स :Robberyचोरीbankबँक