समिती मार्केट यार्डवर धानाची आवक

By Admin | Updated: September 27, 2016 00:35 IST2016-09-27T00:35:05+5:302016-09-27T00:35:05+5:30

खरीप हंगामात लागवड केलेल्या धान पिकाची लगेच कापणी व मळणीला तालुक्यात सुरुवात होऊन...

Arrivals in the committee market yard | समिती मार्केट यार्डवर धानाची आवक

समिती मार्केट यार्डवर धानाची आवक

शेतकऱ्यांचा सत्कार : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार 
तुमसर : खरीप हंगामात लागवड केलेल्या धान पिकाची लगेच कापणी व मळणीला तालुक्यात सुरुवात होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डवर विक्रीकरिता नविन धानाची आवक सुरु झाली आहे. या हंगामातील नविन धानपिकाचे शेतमाल घेवून येणारे प्रथम शेतकरी धनंजय रामकृष्ण गुरवे रा. उमरवाडा, दुलिचंद बिसने, रा. देवसर्रा या शेतकऱ्यांचा बाजार समितीच्या पदाधिकाऱ्याद्वारे शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
गतवर्षी पडलेल्या दुष्काळ व यावर्षी लांबलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतेने ग्रासला होता. मात्र वेळोवेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे धान पिकाचे उत्पादन घेणे शक्य झाले असल्याचे चित्र सध्या तालुक्यात पहावयास मिळत आहे. त्यामुळे हंगामपूर्ण होण्याआधीच प्रगत शेतकऱ्यांनी धानाची कापणी व मळणी करुन तो धान बाजार समितीत विक्री आणने सुरुवात केली आहे. त्यातील प्रथम इरलेले शेतकरी धनंजय गुरवे यांनी श्री लक्ष्मी व्हेरायटीचे ४० बोरे धान अडते अनिल निखाडे यांच्या अडतमध्ये दुर्गा राईस मिल यांनी १,७७६ रुपये प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी केले. तर दुलिचंद बिसने या शेतकऱ्याने १,०१० व्हेरायटीचे ५ बोरे धान अडते सचिन न्यायखोर यांचे अडतमध्ये राकेश खंडेलवाल या व्यापाऱ्यानी खरेदी केले. यावेळी बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती भाऊराव तुमसरे संचालक अनिल जिभकाटे, खुमनलाल चौधरी, अनिल भोयर, अनिल निखाडे, वसंत बालपांडे, दुलिचंद निखाडे, भाष्कर ढेंगे, संजय मेश्राम, मनिष मेश्राम, क्रिष्णा मोटघरे, रामप्रसाद बघेले, राजकुमार कहालकर, दिगंबर समरीत, शंकर निमकर, राहुल पंचभाई व समितीचे हमाल, मापारी, कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Arrivals in the committee market yard