शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा शहरातही होणार अ‍ॅन्टीजेन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:00 IST

नागपूर विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे कोरोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी माथूरकर, डॉ.प्रशांत उईके उपस्थित होते.

ठळक मुद्देसंदीप कदम : प्रत्येक दुकानात तपासणी करणार, कोविड सेंटरबाबत अफवा पसरवू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरात लवकरच अ‍ॅन्टीजेन टेस्ट कीट द्वारे तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी तीन तपासणी केंद्र कार्यान्वित करून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक दुकानातही तपासणी केली जाईल. व्यापारी व नागरिकांनी याला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले.
नागपूर विभागीय आयुक्त संजीवकुमार यांनी मंगळवारी व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे कोरोना प्रादुर्भावाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी माथूरकर, डॉ.प्रशांत उईके उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सीक्स मिनिट वॉक टेस्ट व्यापारी संघटनेला दुकानात प्रत्यक्ष तपासणी तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनी सुद्धा अ‍ॅन्टीजेन तपासणी करून घेण्याच् या सूचना केल्या. सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी टेस्ट करण्याच् या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्याधिकारी भूवनेश्वरी एस यांनी पल्स अ‍ॅस्कीमीटर द्वारे तपासणी करून सीक्स मिनिट वॉक टेस्ट मध्ये भाग घेतला. कोरोनाला न घाबरता प्रत्येक नागरिकांनी तपासणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कदम यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टर संघटनेशी चर्चा करून कोरोना प्रतिबंधात्मक कार्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. होम क्वारंटाईनमध्ये राहण्याची व्यक्तीची इच्छा असेल तर त्यांना गृह विलगीकरणात ठेवा असे ते म्हणाले.
व्यापारी संघटनेसोबत बैठक
शहरातील व्यापारी संघटनेशी जिल्हाधिकाºयांनी बैठक घेतली. यावेळी नगरप्रशासन अधिकारी पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव उपस्थित होते. नियोजित अ‍ॅन्टीजेन टेस्टसाठी व्यापाºयांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. त्याला संघटनेने सकारात्मक प्रतिसाद दिला. वाढता कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व दुकाने ९ ते ५ वाजेपर्यंत सुरु राहणार असून रविवारी सर्व दुकाने सर्व बंद राहतील असे सांगितले.

चार ठिकाणी तपासणी केंद्र प्रस्तावित
भंडारा शहरातील मुस्लिम लायब्ररी चौक, गांधी शाळा, राजीव गांधी चौकात गणेश विद्यालय आणि दसरा मैदानात तपासणी केंद्र कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव आहे. नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना विचारणा करून पुढील कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले. शहरातील प्रत्येक दुकानात जाऊनही तपासणी करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या