शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

अन् संतप्त शेतकऱ्याने ऐन अक्षय्य तृतीयेलाच टोमॅटोच्या शेतीत चालविला ट्रॅक्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 21:12 IST

कोरोनाचा वाढता प्रभाव थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनने बाजारपेठा बंद पडल्या आहेत. त्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, बाजारात कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ आली.

राहुल भुतांगेतुमसर (भंडारा) : कोरोनाचा वाढता प्रभाव थांबविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनने बाजारपेठा बंद पडल्या आहेत. त्याचा फटका भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत असून, बाजारात कवडीमोल किमतीत विकण्याची वेळ आली. या प्रकाराने हतबल झालेल्या तालुक्यातील खरबी येथील एका शेतकऱ्याने तीन एकरातील उभ्या टोमॅटो पिकात ट्रॅक्टर चालविला. अक्षय तृतीयेच्या दिवशी या शेतकऱ्याने उचललेले पाऊल शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे वास्तव होय.आनंद सिंगनजुडे, रा. खरबी, असे शेतकऱ्याचे नाव आहे. आनंद सिंगनजुडे हे गावचे सरपंचही आहेत. खरबी-विहीरगाव शेतात तीन एकर शेतीत टोमॅटोची लागवड केली होती. पाण्याचा योग्य वापर व्हावा या उदात्त हेतूने ठिबक सिंचनचा उपयोग करीत होते. एक लाख रुपयांचे टोमॅटो रोपे एका कृषी प्रोड्युसर कंपनीकडून खरेदी केली होती. मजुरांच्या मदतीने लागवड करण्यात आली. दरम्यान, विविध बँका, सावकार व हातउसने स्वरूपात पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.कोरोनाच्या सावटात बाजारात टोमॅटोला योग्य भाव मिळत नव्हता, तर आता संचारबंदीच्या काळात जिल्ह्यातील संपूर्ण बाजारपेठा बंद आहेत. मागेल त्या भावात ग्राहकांना टोमॅटो गावात विकावे लागत आहेत. टोमॅटोच्या बागेतील टोमॅटो रोपे लागवड, मजूर, ठिबक सिंचन संच, मशागत, रोगांवर नियंत्रणासाठी महागडी औषधी व फवारणी खर्च आवाक्याबाहेर जात पाच लाख रुपये खर्च केले. मात्र, टोमॅटोच्या बागेतून उत्पादन व लागवडीचा खर्च निघेनासा झाला. पाच लाख रुपये खर्च करून एक लाख रुपयेही नफा कमाविता येत नसल्याने हतबल शेतकऱ्याने शुक्रवारी टोमॅटोच्या शेतीत चक्क ट्रॅक्टर नांगर चालवून बाग उद्‌ध्वस्त केली. शेतात राबराब राबून भाजीपाला विकण्यासाठी सध्या गल्लोगल्ली फिरावे लागत आहे. त्यानंतरही मोठे नुकसान होत आहे. अशी अवस्था एकट्या आनंदचीच नाही, तर जिल्ह्यातील इतरही शेतकऱ्यांची आहे."नागपूर येथून टोमॅटोचे रोपटे खरेदी करून तीन एकरांत लागवड केली. यंदा कोरोनाच्या सावटात बाजारपेठा बंद, उन्हाळ्यात येणारा अवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात टोमॅटो तोडणीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. नाइलाजाने तीन एकरांतील टोमॅटोच्या बागेत ट्रॅक्टरने नांगर चालवून पीक उद्‌ध्वस्त करावे लागले."- आनंद सिंगनजुडे, टोमॅटो उत्पादक शेतकरी.

टॅग्स :Farmerशेतकरीcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस