शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

अन् बदललेले रुप पाहून ‘तो’ खुदकन हसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST

भंडारातील खात रोडवरील म्हाडा कॉलनी तशी उच्चभ्रू वस्ती. आठवडाभरापासून एक ३०-३५ वयोगटातील वेडसर व्यक्ती या परिसरात फिरत होता. केसांच्या पूर्ण जटा झालेल्या आणि काळेकुट्ट कपड्यामुळे त्याचे रुप भीतीदायक दिसत होते. फारसे कुणी त्याच्याकडे लक्षही दिले नाही. मात्र याच कॉलनीत राहणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ मृण्मयी नरेंद्र बन्सोड यांना ही माहिती मिळाली.

ठळक मुद्देसंडे अँकर । माणुसकीचा हात : दाढी, कटींग व आंघोळ करून दिले नवीन कपडे

ज्ञानेश्वर मुंदे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : तो कोण, कुठला, कधी आला कुणालाही माहित नाही. केसांच्या जटा झालेल्या. अंगावर काळेकुट्ट कपडे. विमनस्क अवस्थेत तो बसून होता. त्याचे भीतीदायक रुप पाहून कुणी जवळ जायलाही तयार नव्हते. मात्र याच परिसरातील एका मानसोपचार तज्ज्ञाने पुढाकार घेतला. नागरिकांच्या मदतीने त्याची दाढी, कटींग करून आंघोळ करून दिली. नवीन कपडेही दिले. बदललेले आपले रुप पाहून तो गालात खुदकन हसला. माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय भंडारा शहरातील म्हाडा कॉलनीत शुक्रवारी आला. सध्या तो वेडसर इसम भंडाराच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.
भंडारातील खात रोडवरील म्हाडा कॉलनी तशी उच्चभ्रू वस्ती. आठवडाभरापासून एक ३०-३५ वयोगटातील वेडसर व्यक्ती या परिसरात फिरत होता. केसांच्या पूर्ण जटा झालेल्या आणि काळेकुट्ट कपड्यामुळे त्याचे रुप भीतीदायक दिसत होते. फारसे कुणी त्याच्याकडे लक्षही दिले नाही. मात्र याच कॉलनीत राहणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ मृण्मयी नरेंद्र बन्सोड यांना ही माहिती मिळाली. त्यांनी शुक्रवारी त्याचा शोध सुरु केला. म्हाडा कॉलनीतील बगीचात तो विमनस्क अवस्थेत बसून होता. त्याचे भीतीदायक रुप पाहून जवळ जाण्यासही कुणी धजावत नव्हता. मात्र मृण्मयी बन्सोड व त्यांचे सहकारी केतन डुंभरे यांनी त्याची विचारपूस केली. परंतु तो काहीही बोलत नव्हता. शून्यात दृष्टी लागून तो फक्त पाहात होता. त्याला कशी मदत करता येईल याचा विचार सुरु झाला. दाढी कटींग करून आंघोळ घालण्याचे ठरविण्यात आले. साई अनंत सलूनचे अनंत वकुलकार यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. आढेवेढे घेत तो वेडसर कटींग करण्यासाठी तयार झाला. तीन चार जणांनी त्याला पकडून ठेवले. तेव्हा कुठे त्याची दाढी-कटींग झाली. आंघोळ करून त्याला नवीन कपडे घालून दिले. आपले स्वत:चेच बदललेले रुप पाहून तो वेडसर गालात खुदकन हसला आणि मदत करणाऱ्यांच्या चेहºयावर समाधानाचे भाव उमटले.
सदर वेडसर व्यक्तीला सायंकाळी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तो वेडसर असल्याचे प्राथमिक निदान करण्यात आले असून त्याला लवकरच नागपूर येथील मनोरुग्णालयात उपचारासाठी पाठविले जाणार आहे.
माणुसकी जीवंत असल्याचा प्रत्यय या घटनेने भंडारेकरांनी दिला. मृण्मयी बन्सोड यांना जितेंद्र सतदेवे, ताई कठे, नरेंद्र बन्सोड, ताई निकोडे, ताई खोब्रागडे, विजया बन्सोड आदींनी सहकार्य केले.

तो कुठला?
सदर वेडसर व्यक्ती एक शब्दही बोलत नाही. शून्यात दृष्टी लावून तो फक्त टकमक बघतो. त्यामुळे तो कुठून आला, कधी आला, त्याचे नातेवाईक कुठे आहेत याचा काहीही थांगपत्ता लागला नाही. मात्र म्हाडा कॉलोनीतील नागरिकांनी त्याला पूर्ववत आणण्याचा निश्चय केला. सुरूवातीला त्याची दाढी कटिंग करून आंघोळ घालण्यात आली. नवीन कपडे घातल्यानंतर त्याचे रूपच बदलले. भीतीदायक रूप जावून तो पूर्ववत दिसू लागला. त्याच्याजवळ कोणतेही साहित्य नसल्याने त्याची ओळख पटविण्याचे मोठे दिव्य सध्या आहे. भंडारा शासकीय रुग्णायात उपचार सुरू असून त्याला लवकरच नागपुरच्या मनोरूग्णालयात उपचारासाठी पाठविले जाणार आहे. मात्र त्याची ओळख कशी पटेल आणि तो घरी जाईल का, हा प्रश्न कायम आहे.

टॅग्स :Socialसामाजिक