लॉकडाऊननंतर आठवडी बाजार पटाच्या मैदानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:01:07+5:30

अनेक वर्षापासून साकोलीचा आठवडी बाजार महामार्गाच्या दोन्ही बाजूला व एकोडी रोडच्या दोन्ही बाजूला भरत आहे. बाजाराच्या दिवशी येथील वाहतूक अडचणीची होत होती. तर बरेच अपघातही घडले आहेत. त्यामुळे हा बाजार पटाच्या मैदानावर हटविण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरु होते. गतवर्षी मार्च महिन्यात नगरपरिषदेतर्फे सदर आठवडी बाजार पटाच्या मैदानावर भरविण्यात आला.

After the lockdown the weekly market on 'shankar pat' ground | लॉकडाऊननंतर आठवडी बाजार पटाच्या मैदानावर

लॉकडाऊननंतर आठवडी बाजार पटाच्या मैदानावर

Next
ठळक मुद्देसाकोली नगरपरिषदेतर्फे तयारीला सुरुवात, भाजीविक्रेत्यांसाठी सर्व सोयी उपलब्ध होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : कित्येक वर्षापासून साकोली आठवडी बाजाराचा विषय प्रलंबित आहे. महामार्गावर भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे वाहतुकीला अडचणी तर निर्माण होतच होत्या. शिवाय अपघाताचे प्रमाणही वाढत होते. मात्र आता लॉकडाऊन संपताच हा आठवडी बाजार साकोली येथील पटाच्या मैदानावर भरविण्यात येणार आहे. यासाठी नगरपरिषदेतर्फे तयारी सुरु करण्यात आली आहे.
अनेक वर्षापासून साकोलीचा आठवडी बाजार महामार्गाच्या दोन्ही बाजूला व एकोडी रोडच्या दोन्ही बाजूला भरत आहे. बाजाराच्या दिवशी येथील वाहतूक अडचणीची होत होती. तर बरेच अपघातही घडले आहेत. त्यामुळे हा बाजार पटाच्या मैदानावर हटविण्यात यावे, यासाठी प्रयत्न सुरु होते. गतवर्षी मार्च महिन्यात नगरपरिषदेतर्फे सदर आठवडी बाजार पटाच्या मैदानावर भरविण्यात आला. जवळपास मार्च, एप्रिल व मे महिन्यापर्यंत आठवडी बाजार तेथे भरलाही. मात्र पहिल्याच पावसात त्या मैदानावर चिखल झाले. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनी पुन्हा आपआपली दुकाने पूर्ववत महामार्गाच्या दोन्ही बाजूला लावले व तेव्हापासून हा बाजार जुन्याच जागी भरत आहे. मागील वर्षी पटाच्या मैदानावर बाजार भरविण्यासाठी मैदान साफसफाई करण्यासाठी नगरपरिषदेतर्फे लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र मटन चिकन व मासेंची दुकाने जुन्याच ठिकाणी होती. त्यामुळे बाजारासाठी दोन ठिकाणी जावे लागत होते.

मुख्याधिकाऱ्यांनी केले लक्ष केंद्रीत
साकोली नगरपरिषदेत नुकत्याच रुजू झालेल्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी आल्याआल्या सर्वप्रथम साकोलीच्या आठवडी बाजार, मटन मार्केटवर लक्ष केंद्रीत करून बाजार सुव्यवस्थीत केला. तर सेंदूरवाफा व साकोली येथील मटन मार्केट एकाच ठिकाणी पटाच्या मैदानावर आणला. आता इतरत्र तीन ठिकाणी भरणारा भाजीपाल्याचा बाजार हा पटाच्या मैदानावर भरविण्यासाठी सर्वसोयी करण्यास प्रारंभ केला आहे. सदर काम पूर्ण होताच लवकरच साकोलीचा आठवडी बाजार हा पटाच्या मैदानावर भरणार आहे.

सहकार्याची अपेक्षा
साकोलीचा आठवडी बाजार महामार्गाच्याकडेला भरत असल्याने नेहमीच अपघात घडत असतात. त्यामुळे येथील आठवडी बाजार शहरातीलच पटाच्या दाणीवर भरविण्यात यावे, अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र याला योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने समस्या मार्गी लागली नाही. पटाच्या दाणीवर बाजार भरविण्यासाठी आता सहकार्याची अपेक्षा आहे.

Web Title: After the lockdown the weekly market on 'shankar pat' ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.