शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कंपनीनंतर निसर्गाचाही दगा

By admin | Updated: October 10, 2016 00:31 IST

एक विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या पहिल्या दिवशी कृषी केंद्रातून शेतात पेरायला बियाणे घेतले.

आर्थिक संकट : अड्याळ व परिसरातील शेतकरी त्रस्त विशाल रणदिवे अड्याळएक विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी ज्या पहिल्या दिवशी कृषी केंद्रातून शेतात पेरायला बियाणे घेतले. तेव्हा संपूर्ण भंडारा जिल्ह्यात पेरले पण उगवलेच नाही, असे घडले. त्यानंतर कृषी केंद्र चालकांनी दिलेली पावती व रिकाम्या बॅग, बियाणे बोगस निघालेल्या परत घेऊन पुन्हा पेरणी करायला धान्य बियाणे तर दिले. परंतु शेतकऱ्यांचा गेलेला वेळ, झालेला मानसिक त्रास व पेरणीसाठी येणारा खर्च मात्र दिला नाही. तरीसुद्धा बळीराजा थकला वा रुसला नाही. दुबार तिबार पेरणी करून मातीत मोती उगविले आणि मोती जेव्हा मातीमोल जर होत असेल तर काय अवस्था होईल त्या शेतकऱ्याची? असाच काहीसा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.अड्याळ व परिसरातील सर्वपक्षीय नेते मंडळी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुष्कळ काही करतात आणि करतोही म्हणतात. परंतु गेल्या १२ वर्षापासून कृषी उत्पन्न समितीचा बाजार हा अड्याळ मधून बेपत्ता आहे. तो सुरु व्हावा म्हणून शेतकरी चर्चा करतात. मग शेतकऱ्यांचे हित जोपासणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना यासाठी अपयश का आले असणार? याला जबाबदार कृषी उत्पन्न बाजार समिती की सत्ता बदलीचा परिणाम असावा की दमदार नेतृत्वाचे नेते मंडळी नसल्याचे कारण? अशा अनेक प्रश्नात अड्याळ व परिसरातील शेतकरी या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विषयी बोलताना आढळतो. यावर्षी येथील शेतकऱ्यांना पाऊस वेळेवर पडला नाही. कधी पेरले पण उगवले नाही. त्यामुळे दुबार पेरणी, पेरलेल्या बियाण्यांना वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याने तिबार पेरणी केली. शेतात जेवढा पाणी तेवढीच रोवणी. थेंबे थेंबे तळे साचे, या प्रमाणे करून पूर्ण मळा फुलविला. त्यानंतर नेरला उपसा सिंचन सुरु केल्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. काही दिवसाआधी शेतकरी व त्याचे कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. परंतु या आठवड्यात आलेल्या बेमोसमी पावसामुळे मात्र मेहनतीवर पाणी फिरण्याचे लक्षण दिसत असल्याने सर्व शेतकऱ्यांचे हाल बेहाल झाल्याचे दिसत आहे.मागील वर्षीपेक्षा यावर्षी पीक चांगली भरभरून उभी होती. परंतु या निसर्गाच्या लहरीपणामुळे डौलात डोलणारी उभी पिक आज मात्र जमिनदोस्त झाली आहेत. जेवढे दु:ख पेरले पण उगवले नाही त्यावेळपेक्षाही आता उभी पिक पाण्यात गेल्यामुळे होत आहे. शेतकऱ्यांनी गोष्ट ऐकायची कुणाची विश्वास ठेवावा कुणावर? हवामान खात्याचे अंदाज फोल ठरतात, नवनवीन जास्त उत्पादन देण्याचे दावे सांगणारे बियाणे कंपनी ही लुबाडणूक करायला थांबत नाही. निसर्ग ऋतू चक्रावरचा विश्वासही राहिलेला नाही. मग करायचे काय? समजा समस्त शेतकऱ्यांनी शेती कसणे जर बंद केले अशी कल्पना जरी केले तर काय होईल. म्हणण्यापेक्षा काय काय नाही होईल म्हणून अन्न हे पूर्णब्रम्ह आहे आणि त्यामुळे अन्नाला जो मेहनतीने उत्पन्न करतो त्याकडे बाकीपेक्षा आधी लक्ष देणे आहे.