आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

By Admin | Updated: March 29, 2015 00:54 IST2015-03-29T00:54:04+5:302015-03-29T00:54:04+5:30

थकीत वेतन मिळावे यासाठी पवनी तालुक्यातील गोसे येथील बाबा खंताळू माध्यमिक व प्राथमिक आश्रमशाळा कर्मचारी उपोषणाला बसले होते.

After the assurance, after the assertion of fasting | आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

आश्वासनानंतर उपोषणाची सांगता

भंडारा : थकीत वेतन मिळावे यासाठी पवनी तालुक्यातील गोसे येथील बाबा खंताळू माध्यमिक व प्राथमिक आश्रमशाळा कर्मचारी उपोषणाला बसले होते. शुक्रवारी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या निर्देशानुसार समाजकल्याण अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले. यानंतर उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपोषणाचा पाचवा दिवस उजाडताच उपोषणकर्त्या तीन ते चार कर्मचाऱ्यांच्या प्रकृती बिघडण्याच्या मार्गावर होत्या. वैद्यकीय चाचण्या करण्याची कार्यवाही सुरू झाली. त्यामुळे उपोषण कशाप्रकारे सोडविता येईल याबद्दल सर्व कामाला लागले. उपोषणकर्ते मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण मागे घेण्यास तयार नव्हते.
शिक्षक आमदार नागो गाणार, म. रा. शिक्षक परिषद, आम. रामचंद्र अवसरे, आम. चरण वाघमारे, तारीक कुरेशी, अंगेश बेहलपांडे आदींनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी चर्चा केली. बडोले यांनी उपोषणकर्त्याची वेतनाची मागणी मान्य करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश दिले. याची माहिती सहायक आयुक्त कार्यालयाला मिळाली. उपोषणाचे नेतृत्व करणारे मोरेश्वर शेंडे, लक्ष्मीकांत तागडे, भाऊराव बडोले, केवळ तलमले व कर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली. आमदार नागो गाणार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मागणी पूर्ण झाल्यामुळे उपोषण सोडण्याचे निर्देश दिले. कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य झाल्यामुळे उपोषण संपविण्याचे ठरविले. देवसूदन धारगावे, सदाफळे, प्रताप पवार यांच्या हस्ते उपोषणकर्ते मोरेश्वर शेंडे, लक्ष्मीकांत तागडे, भाऊराव बडोले, प्रमोद शेंदरे, केवळ तलमले, भास्कर गजभिये, पृथ्वीराज वानखेडे, सुखराम नान्हे, प्रकाश बोरकर यांना निंबू शरबत देवून उपोषण सोडविण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: After the assurance, after the assertion of fasting