शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांच्या याद्यांचे वाटप

By admin | Updated: February 24, 2017 00:35 IST

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या युद्धस्तरावर पूर्ण करण्यात आल्या. आज मोहाडी तालुक्यातील

तातडीची सभा : दुकानदारांना याद्यांचे वितरणमोहाडी : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या युद्धस्तरावर पूर्ण करण्यात आल्या. आज मोहाडी तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानदारांना तातडीने तहसिलमध्ये बोलावण्यात आले. तातडीची सभा घेण्यात आली. सभेतच अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या वाटप करण्यात आल्या. त्यामुळे आता दुकानात पोहचलेले धान्य लाभार्थ्यांपर्यंत जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या याद्या तयार झाल्या नाहीत. तथापि, लाभार्थी कोण याचा पत्ता नसताना इष्टांकानुसार सरकारी स्वस्त धान्य दुकानात गहू, तांदूळ पोहचले होते. त्या धान्याचे वाटप करण्याची अडचण होती. काल लोकमतमध्ये लाभार्थ्यांच्या याद्यांविना धान्य पोहचले दुकानात ही बातमी प्रकाशित झाली. प्रकाशित झालेल्या बातमीमुळे तहसिल कार्यालयातील प्रशासन एकच खळबळ निर्माण झाली. तीन महिन्यापासून याद्यांच्या प्रतिक्षेत असलेल्या धान्य दुकानदारांना गुरूवारी तहसिल कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्या दुकानदारांची सभा तहसलिदार धनंजय देशमुख यांनी घेतली. सभेत अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांच्या याद्या वाटप करण्यात आल्या. तसेच तातडीने यादीतील लाभार्थ्यांना धान्याचे वाटप करण्यात यावे तसेच लाभ घेण्याऱ्या व्यक्तींच्या याद्यातील नावे अंतिम नाहीत. त्या याद्या ग्रामदक्षता समितीसमोर आणाव्यात. याद्यामध्ये चुकां होवू शकतात, असे प्रामाणिकपणे तहसिलदार धनंजय देशमुख यांनी सांगितले. आज १०६ स्वस्त धान्य दुकानदारांपैकी ६३ धान्य दुकानदारांना याद्यांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच याद्या वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. बऱ्याच धान्य दुकानदारांपर्यंत सभेचा संदेश पोहचला नाही. बरेच धान्य दुकानदार सभेला पोहचले नव्हते. त्यामुळे त्या दुकानदारांना वैयक्तीकपणे मोबाईलवर संदेश देणे सुरू आहे. शक्य तेवढ्या लवकर धान्याचे वाटप करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच मार्च महिन्याचे धान्य पास करण्यात आल्याची माहिती आहे. आज ७३ धान्य दुकानदारांना याद्या प्राप्त झाल्या. त्या याद्यांमध्ये सधन व्यक्तीचे नाव आत सुरक्षा योजनेत समाविष्ट असल्याची माहिती मिळाली. यादीमधील त्या अपात्र व्यक्तीला लाभ दिला जाईल. गावात दूषित वातावरण तयार होण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. धान्य दुकानदारांना देण्यात आलेल्या याद्या स्वस्त धान्य दुकान व ग्रामपंचायत येथे प्रसिद्ध करण्याची मागणी काहींनी केली आहे. याद्यांचे वाचन ग्रामसभेत झाल्यानंतर त्या याद्यांना अंतिम प्रारूप देण्यात यावे. याद्या पूर्णनिरीक्षण झाल्यानंतर याद्यांना अंतिम मान्यता दिली जावी. त्यावर पुन्हा तहसिलदार यांची स्वाक्षश्रीनिशी त्या याद्या स्वस्त धान्य दुकानदारांना पाठविण्यात याव्यात अशी मागणी आहे. याद्यामध्ये नक्कीच घोळ आहे अशी चर्चा बाहेर पडत आहे. (तालुका प्रतिनिधी)