शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही गोवारी समाज अधांतरी

By admin | Updated: November 27, 2014 23:29 IST

समाजातील प्रत्येक घटकाला शासनाने प्रगती व विकास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. समाजातील वर्गानुसार व जातीनुसार आरक्षण उपलब्ध करून दिले आहे.

मोहाडी : समाजातील प्रत्येक घटकाला शासनाने प्रगती व विकास करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. समाजातील वर्गानुसार व जातीनुसार आरक्षण उपलब्ध करून दिले आहे. परंतु समाजातील आदिम घटक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वतंत्र्य लढयात महत्वाचे स्थान असणाऱ्या गोवारी समाजाच्या वाट्याला स्वातंत्र्याच्या ६७ वर्षानंतरही नेहमी उपेक्षा आली आहे.गोवारी समाजाचा मुख्य व्यवसाय गोपालन व शेळीपालन करण्याचा आहे. २१ व्या शतकात गोवारी समाजाच्या वाट्याला दुर्दैव आले आहे. गोवारी समाजात अनेक गरीब उपजातींचा समावेश आहे. तरीही त्यांच्या वाट्याला फक्त २ टक्के आरक्षण, त्यामुळे या समाजाच्या प्रगतीच्या वाटा खुंटल्या आहेत. आपल्याला आपले हक्क मिळावे यासाठी शांततेच्या मार्गाने २३ नोव्हेंबर १९९४ रोजी महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. या ठिकाणी लहान मुलांपासून तर वृद्ध पडक्यात भाकरी बांधून जमले होते. दिवसभर अनेक मंत्र्यांना विनवन्या करूनही एकही मंत्री मोर्चाला सामोरे न आल्याने नेत्यांच्या निराशेतून जमाव हिरमुसला. याचवेळी मोर्चातील उपस्थितामध्ये चलबिचल सुरू झाल्याचे हेरून नेतृत्वहीन समाजावर पोलिसांनी अंधाधुंद लाठीमार केला. लहानांपासून, तरूण वृद्धापर्यंत सर्वाच्या चेहऱ्यावर स्वाभिमान व हक्काचे तेज दिसत असताना रक्तरंजीत परिस्थिती निर्माण झाली. गोवारींच्या समस्येवर तोडगा न काढता पोलिसांनी लाठीमार केला. त्यात धावाधाव होवून रक्तामासाचा सडा पडला. आई, बाबा, काका, मामा असा आवाज करून जो तो पळू लागला. त्यात लहान बालकेही पायााखाली चिरडली गेली. त्यात अनेक घरे बेघर झाली, तर मुले पोरकी झाली. आई-वडिल मुलांसाठी अश्रुच्या सागरात बुडाली. त्या काळ्या दिवशी ११४ गोवारी बांधवाची निर्घृण हत्या झाली. शासनाने गोवारींचा आवाज दडपण्यासाठी आर्थिक भरपाई दिली व सीताबर्डीवडील उड्डाण पुलाला गोवारी उड्डाण पुल असे नाव दिले. पण त्यांना अधिकार दिले नाहीत. गोवारी हत्याकांड होवून आज २० वर्षे झाली. आदिवासीत्व बहाल करण्याची एकमेव मागणी जागच्या जागी, जशीच्या तशीच अडगळीत पडून आहे. त्यामुळे विकासाअभावी एक पिढी बर्बाद झाली आहे. अजून किती पिढ्यांच्या बर्बादाची वाट पाहणार आहेत, की कायमच अंगावर अंधार पांघरून ११४ गोवारींचे बलिदान वाया घालविणार याचा गांभीर्यपूर्वीक विचार करण्याची वेळ आली आहे. गोवारी जमात मुळातच नागरी संस्कृतीपासून कोसो मैल दूर आहे.हत्याकांडानंतर समाजाला संघटीत करून त्यांच्यात जनजागृती करणे, आपल्या अधिकाराच्या लढाईत शहीद झालेल्या लोकांच्या संदर्भात समाजाला जागृत करणे गरजेचे होते, परंतु समाजातील नेत्यांच्या असंघटीतपणामुळे एकता प्रस्थापित होण्यास आडकाठी निर्माण होत आहे. गारूड्याने डमरू वाजविताच साप-मुंगुसाची लढाई पाहण्यासाठी लहान मुले सभोवताल गोळा होतात, तसा प्रकार सुरू आहे. त्यामुळे समाजातील लोकांना न्याय मिळत नाही. हा समाज अद्यापही हालअपेष्टांच्या गर्तेत सापडला आहे. त्यातून बाहेर काढणारा लोकप्रतिनिधी मिळालेला नाही ही खरी शोकांतिका आहे.(शहर प्रतिनिधी)