शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे दमदार आगमन; बळीराजा सुखावला

By admin | Updated: September 12, 2016 00:27 IST

पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता होता. सर्वत्र उकाडा सुरु होता. वातावरण तापले होते. घरोघरी तापाचे रुग्ण वाढले होते.

धानपिकाला आधार : मोहाडी व तुमसर तालुक्यात मात्र अपेक्षेप्रमाणे कमी, पावसाची टक्केवारी ६६भंडारा : पंधरा दिवसांपासून पाऊस बेपत्ता होता. सर्वत्र उकाडा सुरु होता. वातावरण तापले होते. घरोघरी तापाचे रुग्ण वाढले होते. शेतीला भेगा पडल्या असून पाण्याविना धानपिक पिवळे पडले होते. या पावसामुळे धानपिकाला बऱ्याच प्रमाणात फायदा झाला आहे. या दमदार पावसामुळे बळीराजा काही प्रमाणात का असेना सुखावला आहे. जिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी ३२.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.पवनी/पालोरा : महिन्याभरापासून रुसलेला वरुणराजा पुन्हा बरसला. पवनी तालुकयात ५३मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून चौरास भागात याचा फायदा होणार आहे. साकोली : तालुक्यात काल रात्री ८ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा कालच्या पावसाने सुखावला आहे. लाखांदूर : तालुक्यात मागील २४ तासात ४१.४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली असून धान व अन्य पिकांना या पाण्याचा फायदा होणार आहे.लाखनी : काल रात्री व आज सकाळी आलेल्या पावसामुळे धान पिकांना संजीवणी मिळाली आहे. पंरतु ज्या ठिकाणी पुर्णपणे रोवणी खोळंबली होती. अश्या ठिकाणी या पावसाचा फायदा होणार नाही.मोहाडी : मागील पंधरा दिवसांपासून पालोरा परिसरात वरुण राजाची कृपा न झाल्यामुळे धान पिक करपले होते. जमिनीला भेगा पडल्या होत्या. पाण्याविना धान पिक धोक्यात आले होते. मात्र वरुणराजाने हजेरी लावली असली तरी अजूनही मुसळधार पावसाची गरज आहे.तुमसर : तालुक्यात मात्र काल फक्त ५.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तुमसर तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान क्षेत्र असल्याने पाण्याची गरज आहे. (लोकमत चमू)जिल्ह्यात सरासरी ३२ मिमी पाऊसजिल्ह्यात मागील २४ तासात सरासरी ३२.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील २४ तासात भंडारा तालुक्यात ४०.८ मिमी, मोहाडी तालुक्यात १२.४ मिमी, तुमसर ५.२ मिमी, पवनी ५३ मिमी, साकोली ३०.०६ मिमी, लाखांदूर ४१.४ मिमी तर लाखनी तालुक्यात ४५.८ मिमी पाऊस बरसला आहे. आतापर्यंत १ जून पासून बरसलेल्या पावसाची टक्केवारी ६६ इतकी आहे. टक्केवारी बघता पाऊस या प्रमाणात बरसला असला तरी तो सातत्यपूर्ण नसल्यामुळे या टक्केवारीचा फायदा धानपिकाला वेळोवेळी झालेला नाही. कालच्या पावसाने बळीराजा तात्पूरता सुखावला असला तरी अजून मुसळधारपावसाची गरज असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे.सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढभंडारा : गत १५ दिवसांपासून वातावरण बदलामुळे विषाणूजन्य आजार बळावले आहेत. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, तसेच विषाणुजन्य कावीळ रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या ओपीडीत रुग्णांची गर्दी आहे. विशेषत: लहान मुलांचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. जून अखेरीस व जुलैच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली. आॅगस्टमध्ये पाऊस बेपत्ता झाल्याने ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यासारखे वातावरण तयार झाले होते. १० सप्टेंबर रोजी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. वातावरणात झालेल्या या बदलामुळे साथीचे आजार बळावू लागले आहेत. ओलसर व चिखलमय रस्ते कोरडे पडल्याने वाहने जाताना उडणाऱ्या धुळीमुळे संसर्गजन्य आजार बाळवू लागले आहेत. विशेषत: लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. वातावरणातील या बदलामुळे लहान मुलांसह वयोवृद्ध, महिलांही आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी याबरोबरच विषाणुजन्य कावीळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. सध्या शहरासह ग्रामीण भागातील लहान लहान दवाखान्यांत रुग्णांची संख्येत चांगलीच वाढ झालेली दिसते. प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. बहुतांशी नागरिकांत ताप, सर्दी, खोकला, घसादुखी यासारख्या विषाणुजन्य आजारांचा संसर्ग वाढलेला दिसतो. डासांची उत्पत्ती होऊ लागल्याने साथीचे आजार होऊ लागल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. पाण्याची डबकी हे डास उत्पत्तीचे ठिकाण आहे. अशा डबक्यातील पाणी वाहते करावे. सध्या विषाणुजन्य आजाराला पोषक वातावरण निर्माण झालेले आहे. लहान मुलांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. (नगर प्रतिनिधी)