शहरं
Join us  
Trending Stories
1
साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; जागतिक बाजारपेठेत संकटाची भीती
2
CNG Price Hike: महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ, पाहा काय आहे नवी किंमत?
3
आजचे राशीभविष्य - १४ मे २०२६, अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, उत्पन्नात व व्यापार-व्यवसायात वाढ होईल
4
इमरान खान यांच्या पहिल्या पत्नी जेमिमा अब्जाधीश गुंतवणूकदारासोबत रिलेशनशिपमध्ये
5
मोठी बातमी! LPG आणणाऱ्या 'एमव्ही सनशाईन' जहाजाने पार केले होर्मुझ, नौदलाचे कडेकोट संरक्षण
6
भरघोस पगारासह देशसेवेची संधी! भारतीय वायुसेनेची भरती जाहीर; जाणून घ्या महत्वाच्या तारखा...
7
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
8
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
9
अग्रलेख: सोने घ्यावे की न घ्यावे? निर्णय घेण्याची वेळ आली आहे
10
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
11
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
12
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
13
विशेष लेख: पावसाचा अंदाज सुधारण्याची शक्यता आहे!
14
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
15
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
16
Sindhudurg: ‘ती’ अखेरची क्लिक ठरली जीवघेणी; हसत्या-खेळत्या तिघींचा धरणात करुण अंत!
17
लेख: बिनपैशाच्या बदल्या होऊ शकतात की नाही?
18
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
19
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
20
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला हरवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:01 IST

ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पवनी नगराचे संरक्षण करण्यासाठी इंग्रजी यू आकाराची मातीची भिंत (टेकडी) असल्याने नगरात प्रवेश करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात जवाहर गेट एकमेव मार्ग होते. लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या त्यामुळे भिंतीला खिंडार पाडून गावाचे सभोवताली रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे संचारबंदी असतांना नगरात वाट्टेल त्या मार्गाने प्रवेश करणे सोयीचे झाले होते.

ठळक मुद्देपवनी नगरपरिषद व पोलीस यंत्रणेचा पुढाकार : सुरक्षिततेसाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे

अशोक पारधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : विश्वस्तरावर महामारी म्हणून घोषीत केलेल्या कोरोना संकटावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे प्रत्येक राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामीण भागात संचारबंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी होत आहे. संचारबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नगरपरीषद प्रशासन व पोलीस यंत्रणा यांचे समन्वय ठेवून अविरत प्रयत्न सुरु आहेत. परिणामी कोरोनाला हरवण्यात प्रशासनाला एप्रिल अखेरपर्यंत यश आले आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या पवनी नगराचे संरक्षण करण्यासाठी इंग्रजी यू आकाराची मातीची भिंत (टेकडी) असल्याने नगरात प्रवेश करण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात जवाहर गेट एकमेव मार्ग होते. लोकसंख्या वाढली, गरजा वाढल्या त्यामुळे भिंतीला खिंडार पाडून गावाचे सभोवताली रस्ते तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे संचारबंदी असतांना नगरात वाट्टेल त्या मार्गाने प्रवेश करणे सोयीचे झाले होते. जिल्ह्याबाहेर असणारे नागरिक मोठ्या प्रमाणात नगरात शिरकाव करु लागले. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली. यावर मात करण्यासाठी नगरपरीषद व पोलीस यंत्रणा यांनी चंद्रपूर, गडचिरोली, पुणे व नागपूर येथून गावात येऊ पाहणाऱ्यांच्या चोरवाटा बंद करण्यासाठी कसोसीचे प्रयत्न केले. सुरुवातीला नगरवासीयांचा रोष पत्करावा लागला. परंतु आरोग्य सुरक्षित राहीले. त्यामुळे नागरिकांनी गावबंदी आनंदाने स्विकारली. जवाहर गेट ते वैनगंगा नदीपर्यंतचे सर्व रस्ते पाईप व बॅरीकेट लाऊन बंद केले. वाहनांची ये-जा बंद झाली. पोलिसांनी निष्टी गावाजवळ लावलेले चेकपोस्ट व जंगलातून चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरकडून येण्यासाठी असलेल्या चोरवाटा जेसीबीच्या सहाय्याने आडवी नाली खोदून बंद केले. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्य घेतले.
ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांच्या तपासणी पथकाने क्वारंटाइन करण्यात आलेल्या नागरिकांच्या गृहभेटी व तपासणी सुरु ठेवले. या सर्वांचा परिणाम असा झाला की नगरातील नागरिक सुरक्षित राहिले.
पालिकेने शहर निर्जंतूक ठेवण्यासाठी गल्ली-बोळात फवारणी सुरु ठेवली. बाजार चौकातील गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी बाजाराचे विकेंद्रीकरण केले. शाळा व सार्वजनिक पटांगणावर नागरिकांचे सोयीसाठी भाजीपाला विक्रेत्यांना जागा निश्चित करुन दिली व फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करीत बाजार भरविण्यात आले. नियमितपणे सुरु असलेली मेडिकल स्टोअर्स व किराणा दुकान सर्व नियमाचे पालन करीत सुरु ठेवण्यासाठी व्यापारी वर्गाने सहकार्य केले. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले. त्यामुळे कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाला यश आले.
पोलीस यंत्रणेकडे एक पोलीस निरीक्षक, दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक व जेमतेम बत्तीस पोलीस कर्मचारी अशा तुटपुंज्या संख्येवर शहर व ग्रामीण भागाची सुरक्षा व परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांचे आवागमन थांबविण्यासाठी कसोसीचे प्रयत्न केले व सुरु आहेत. या सर्वांचे प्रयत्न नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्वाचे ठरले आहे.

पवनी नगराचे सातत्याने निर्जंतुकीकरण करुन नागरिकांनी घरातच राहावे, कामानिमित्त घराबाहेर पडल्यास मास्क, सॅनिटाइझरचा वापर करावा, फिजीकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे. अशा सूचना वारंवार दिल्या. याला नागरिकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे पवनीकर नागरिक सुरक्षित आहेत.
-रवींद्र ढाके, मुख्याधिकारी, नगरपरिषद, पवनी.
नागरिकांची सुरक्षा व परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांना योग्य त्या सुचना देण्यासाठी सहकारी पोलीस अधिकारी व कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. आडवाटा बंद केल्याने अनधिकृतपणे परजिल्ह्यातून येणाºया नागरिकांवर प्रतिबंध करण्यात आला आहे.
-यशवंत सोलसे, पोलीस निरीक्षक, पवनी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या