लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : अपघातात जर एकाद्याचा मृत्यू झाला तर तो जाणुनबुजून केलेला नसून अनवधानाने अचानकपणे झालेली घटना असते. मात्र काही लोक याचे भांडवल करण्यासाठी घटनास्थळी दंगा निर्माण करतात. रास्ता रोको करून उपद्रव करतात. ज्यामुळे पोलिसांच्या कार्यात बाधा निर्माण होते. जखमी व्यक्तींना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यास अडथळा निर्माण होतो. दंगा करणाºया लोकावर कायदेशिर कारवाई करुन गुन्हा नोंद करण्यात येईल, असे मत उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड यांनी येथे पोलिसांतर्फे आयोजित रक्तदान श्ाििबराच्यावेळी व्यक्त केले.रस्ता सुरक्षा पंधरवाडा निमित्त मोहाडी पोलीस ठाणे तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय जोगदंड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक शिवाजीराव कदम, उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम, मोहाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज शेख, उपाध्यक्ष गिरधर मोटघरे, यशवंत थोटे, अफरोज पठाण, सुनिल मेश्राम, अयज गायधने उपस्थित होते. याप्रसंगी सतीश मेहर, पंकज सपाटे, हुकूमचंद आगाशे, युवराज वरकडे, मंगेश गभने, सिराज शेख, अफरोज पठाण, संजय वाकलकर, ओमप्रकाश गेडाम, विनोद सेलोकर, मंजु बांते, दिपाली ठवकर, प्रशांत आगाशे यांनी रक्तदान केले. रक्तदान करण्यासाठी महिला पोलीसही उत्सुकलेल्या पोलीस पती पत्नी या दोघांनी सुध्दा रक्तदान केले. रक्तपेढीतील रक्त संक्रमण अधिकारी डॉ. मिरा सोनवाने, अधिपरिचारीका सुरेखा भिवगडे, रोहिनी हलमारे, वामणराव झोड, राहुल गिरी यांनी सहकार्य केले.वाहन चालवितांना नियमांचे पालन केल्यास अपघातात कमतरता येवु श्कते. अपघात झाल्यास मृतकाला विमा कंपनीकडून आर्थिक मदत सुध्दा मिळते. त्यामुळे अपघात घडल्यास पोलिसांना सहकार्य करावे. दंगा करु नये, जखमी व्यक्तींना वैद्यकिय मदत देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन एसडीपीओ जोगदंड यांनी केले. संचालन अजय गायधने यांनी तर आभार प्रदर्शन उपनिरीक्षक ओमप्रकाश गेडाम यांनी केले.
दंगा करणाऱ्यांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:42 IST
अपघातात जर एकाद्याचा मृत्यू झाला तर तो जाणुनबुजून केलेला नसून अनवधानाने अचानकपणे झालेली घटना असते. मात्र काही लोक याचे भांडवल करण्यासाठी घटनास्थळी दंगा निर्माण करतात. रास्ता रोको करून उपद्रव करतात.
दंगा करणाऱ्यांवर होणार कारवाई
ठळक मुद्देसंजय जोगदंड : पोलीस विभागातर्फे रक्तदान शिबिर