शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

अकार्यक्षम कर्मचाऱ्यांवर होणार कार्यवाही

By admin | Updated: June 30, 2016 00:40 IST

कामांच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदमध्ये वेगवेगळे विभाग अस्तित्वात आहेत.

लघु पाटबंधारे विभागाचा समावेश? : प्रोसिडींगवरील स्वाक्षरीसाठी अडलेप्रशांत देसाई  भंडाराकामांच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदमध्ये वेगवेगळे विभाग अस्तित्वात आहेत. मात्र, येथील अधिकारी व कर्मचारी कामात कुचराईपणा करतात. अशा अकार्यक्षम कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावून कार्यवाही करण्यात येणार आहे. यासाठी येथील वरिष्ठ अधिकारी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या प्रोसिडींगवर अध्यक्षांच्या स्वाक्षरींची वाट बघत आहेत. या कार्यवाहीत लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, हे विशेष.जिल्हा परिषदची सर्वसाधारण सभा १७ जूनला जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर यांच्या सभाध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबैले यांनी लघु पाटबंधारे विभागातील अनियमिततेबाबत ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होत असलेल्या वृत्तांबाबत सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांना विचारणा केली. यावेळी दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदमधील अकार्यक्षम कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सभागृहात दिली. कामांचे योग्य नियोजन करण्यात आले नसल्याने लघु पाटबंधारे विभागाचा १ कोटी ७३ लाखांचा निधी गेला. निविदा प्रकरणी कार्यकारी अधिकारी पी. एस. पराते हे जबाबदार असल्याचे प्रभारी कार्यकारी अधिकारी रामदास भगत यांनी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत कबुल केले. यासह सदर विभाग प्रमुखाने मोठ्या प्रमाणात अनियमितता करून चुकीची निविदा प्रकाशित करून शासनाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. ‘लोकमत’ने प्रकरण लावून धरल्याने निविदा रद्द केली. सभा झाल्यानंतर प्रोसिडींग तयार व्हायला १५ दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे पुढील आठवड्यात अशा कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल का? की, त्यांची पाठराखण करतील याकडे आता जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. कर्मचारी, अधिकाऱ्यांनी घेतली धास्तीसभागृहात विषय आल्याने अकार्यक्षम कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे संकेत मुख्य व अतिरिक्त कार्यकारी अधिकारी यांनी दिले. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कोणावर कार्यवाहीची नोटीस बजावणार याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना उत्स्तुकता लागली आहे. लघु पाटबंधारे विभागाचे तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता रामदास भगत यांनी सभागृहात या सर्व प्रकरणात कार्यकारी अभियंता पी. एस. पराते हे जबाबदार असल्याचे खापर फोडल्याने यात जिल्हा परिषद प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.सर्वसाधारण सभेच्या प्रोसिडींगवर सभाध्यक्षांची स्वाक्षरी होण्यापूर्वी त्याबाबत माहिती देऊ शकत नाही. त्या बाबत बोलने म्हणजे सभागृहाचा अवमान होईल. प्रोसिडींगवर सभाध्यक्षांची स्वाक्षरी झाल्यानंतर ते जनतेसाठी खुले होते. त्यानंतर त्यावर बोलेल.- जगन्नाथ भोरअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा.