शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

हेल्मेट न घालणाऱ्या ४४९८ चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST

संतोष जाधवर / भंडारा : जिल्हा वाहतूक शाखेला प्राप्त इंटरसेप्टर वाहनांतील स्पीडगनच्या साहाय्याने वर्षभरात ४४९८ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई ...

संतोष जाधवर / भंडारा : जिल्हा वाहतूक शाखेला प्राप्त इंटरसेप्टर वाहनांतील स्पीडगनच्या साहाय्याने वर्षभरात ४४९८ विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांना २२ लाख ४९ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. जिल्ह्यात हेल्मेट सक्तीला शिथिलता असली तरी राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या दुचाकी चालकांवर वाहतूक पोलिसांची करडी नजर असते.

अपघातात मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागील महत्वाचे कारण म्हणजे विनाहेल्मेटने दुचाकी चालविणे होय. त्यामुळेच दुचाकी चालकांना हेल्मेट सक्ती करण्यात आली. दुचाकी खरेदी करताना हेल्मेट खरेदी करणे सक्तीचे करण्यात आले. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात अनेक जण हेल्मेट अडगळीत ठेवून सुसाट वेगाने वाहन चालविताना दिसतात. अशा बेदरकार वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र वर्षभरापूर्वी जिल्हा पोलीस दलात दाखल झालेल्या स्पीडगनने विना हेल्मेट वाहन चालकांची नोंद घेतली. पोलिसांनी त्यांना ई-चालान पाठवून दंड ठोठावला. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात ८४ वाहनचालकांना ४२ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात २९२ दुचाकीचालकांना १ लाख ४६ हजार रुपये दंड, मार्च महिन्यात ३०४ चालकांवर कारवाई करून १ लाख ५२ हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आली. एप्रिल महिन्यात ४३५, मे ३७६, जून २२६, जुलै २३३, ऑगस्ट २७६, सप्टेंबर ४४१, ऑक्टोबर ५७०, नोव्हेंबर ६१७, डिसेंबर ६४४ अशी ४४९८ वाहनांवर कारवाई करून २२ लाख ४९ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.

इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगनचा वापर

वाहतूक शाखेकडे उपलब्ध असलेले इंटरसेप्टर वाहन राष्ट्रीय महामार्गावर उभे केले जाते. या वाहनातील स्पीडगनच्या रेंजमध्ये येणाऱ्या वाहनांचे स्कॅनिंग होते. हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीचालकांची नोंद होते. त्याबाबत नोंद होऊन ऑनलाईन कारवाई केली जाते. अनेकांना तर आपल्यावर कारवाई झाली हेही वाहनचालकांना ई-चलान प्राप्त झाल्यावरच माहीत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी पोलीस दलातील सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती केली आहे. लवकरच नागरिकांनाही हेल्मेट सक्ती केली जाईल. वाहन चालविताना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणे आवश्यक आहे. मात्र अनेक जण आजही विना हेल्मेट वाहन चालविताना दिसतात. वाहतूक शाखेला प्राप्त इंटरसेप्टर वाहनाच्या मदतीने आता कारवाई होत आहे.

-शिवाजी कदम, प्रमुख, वाहतूकशाखा