VIDEO: मोठा अनर्थ टळला; भंडारा तालुक्यात कान्होबा विसर्जनावेळी नाव उलटली, सहाही जण थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 17:11 IST2022-08-20T17:07:23+5:302022-08-20T17:11:01+5:30
Bhandara : कान्होबा विसर्जनासाठी क्षमतेपेक्षा अधिक भाविक नावेत बसले. किनाऱ्यापासून काही अंतरावरच नाव हेलकावे खावू लागली. याचवेळी अतिरिक्त भारामुळे नाव नदीपात्रात उलटल्याचे सांगण्यात येत आहे.

VIDEO: मोठा अनर्थ टळला; भंडारा तालुक्यात कान्होबा विसर्जनावेळी नाव उलटली, सहाही जण थोडक्यात बचावले
इंद्रपाल कटकवार -
भंडारा : दीड दिवसाच्या कान्होब्याच्या विसर्जनासाठी वैनगंगा नदीत गेलेल्या सहा भाविकांची नाव उलटली. यावेळी बाजुला असलेल्या नावेतील लोकांनी वेळीच मदत केल्याने सहाही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्यातील खमारी बुटी वैनगंगा नदीपात्रात घडली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
कान्होबा विसर्जनासाठी क्षमतेपेक्षा अधिक भाविक नावेत बसले. किनाऱ्यापासून काही अंतरावरच नाव हेलकावे खावू लागली. याचवेळी अतिरिक्त भारामुळे नाव नदीपात्रात उलटल्याचे सांगण्यात येत आहे. याचवेळी नदी किनाऱ्यावर असलेल्यांपैकी एकाने या घटनेचा व्हीडीओ शुट केला. हा व्हिडीओ सोशल माध्यमावरही जबरदस्त व्हायरल होत आहे. नाव उलटली तेव्हा तिच्या बाजुला चार बोटी होत्या. या बोटींवर असलेल्या लोकांनी समयसुचकता दाखवत बुडत असलेल्यांचे प्राण वाचविले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
मोठा अनर्थ टळला; भंडारा तालुक्यात कान्होबा विसर्जनावेळी नाव उलटली, सहाही जण थोडक्यात बचावले#Kanhobavisarjan#Bhandarapic.twitter.com/GhFOXY5MIi
— Lokmat (@lokmat) August 20, 2022
गेल्या पंधरा वर्षांपूर्वी याच खमारीबुटी नदीपात्रात नाव बुडाल्याने ३६ महिलांचा बुडून करूण अंत झाला होता. कालच्या या घटनेने जुन्या घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.